`संदीप वाजेने थंड डोक्याने डाॅक्टर पत्नीचा खून केला...त्याचे साथीदार शोधायचेत`

नाशिकमध्ये (Nashik) खळबळ उडवून देणाऱ्या डाॅ. सुवर्णा वाजे (Suvarna Waje) प्रकरणातील इतर संशयिक आरोपी शोधण्याचे आव्हान
Dr. Suvarna Waje
Dr. Suvarna Wajesarkarnama
Published on
Updated on

इगतपुरी : नाशिक मनपाच्या वैद्यकीय अधिकारी सुवर्णा वाजे (Suvarna Waje) यांच्या हत्येतील संशयित पती संदीप वाजे (Sandeep Waje) याला शुक्रवार ( ता.४ रोजी ) फोन कॉलच्या आधारे वाडीव-हे पोलिसांनी संशयित म्हणून इगतपुरीच्या न्यायालयात हजर केले. यावेळी सरकारी वकिलांनी १४ दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती मात्र इगतपुरी न्यायालयाने ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली अशी माहिती सरकारी वकील जयदेव रिखे यांनी दिली.

नाशिक ग्रामीण पोलिसांसाठी आव्हान ठरलेल्या या गुन्ह्यातील मुख्य आरोपींपर्यंत पोलिस पोहोचले असले तरी आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे. पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी फाॅरेन्सिक चाचणीचा घेतलेला निर्णय या सर्व तपासात महत्वाचा ठरला. यातील सुवर्णा वाजे या बीएएमस डाॅक्टर होत्या. संदीप हा कंत्राटदार होता. या दोघांतील विवाहसंबंधात तणाव होता. तसेच घटस्फोटापर्यंत ते संबंध गेल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी न्यायालयात केलेल्या दाव्यानुसारस संदीप वाजे याच्यासोबत आणखी कोणी साथीदार होते का, याचा शोध घेण आवश्यक बनले आहेत. तसेच सुवर्णा वाजे यांना आधी ठार करून नंतर जाळले की थेट त्याने त्यांच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला, याचाही पोलिसांना शोध घ्यायचा आहे. वाजे याने थंड डोक्याने हा खून केल्याचे पोलिसांनी न्यायालयास सांगितले. तसेच त्यासाठी त्याने सामग्री कोठून गोळा केली, हे पण तपासले जाणार आहे. वाजे खून करण्याच्या आधी आणि नंतर कोणाच्या संपर्कात होता किंवा कसे हे पण शोधले जाणार आहे.

Dr. Suvarna Waje
निवडणूक जवळ येताच नगरसेवकांच्या तडीपारीचा प्रस्ताव : गुन्हे दाखल असलेले नेते हादरले

वाजे याचा या प्रकरणातील साथीदार पोलिसांच्या रडारवर आला आहे. त्यालाही लवकरच तपासासाठी बोलविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. हा खून कशासाठी करण्यात आला, याचाही पोलिसांना शोध घ्यायचा आहे.

थंड डोक्याने केलेला खून

डॉ. सुवर्णा वाजे यांच्यासोबत घातपात झाल्याचे स्पष्ट झाले होते. वाजे यांच्या हाडांचा डीएनए अहवाल नाशिक ग्रामीण पोलिसांना प्राप्त झाल्यानंतर वाजे कुटुंबीय आणि गाडीत जळालेल्या अवस्थेत सापडलेल्या मृतदेहाचा डीएनए एकच असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे डॉ. सुवर्णा वाजे यांना शहराबाहेर नेऊन त्यांची जाळून हत्या केल्याचे स्पष्ट झाले.

Dr. Suvarna Waje
'पुणे-नाशिक रेल्वे'च्या तरतूदीचे वृत्त दिशाभूल करणारे : अमोल कोल्हे

डॉ सुवर्णा वाजे या नाशिक महापालिकेच्या सिडको रुग्णालयात कार्यरत होत्या. ता.२५ जानेवारी मंगळवारी रात्री नाशिक-मुंबई महामार्गावर मिल्ट्री गेटसमोर त्यांची गाडी जळालेल्या अवस्थेत सापडली. त्यात जळून कोळसा झालेली हाडे होती.

सकाळी कामावर गेलेल्या सुवर्णा वाजे रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने त्यांच्या पतीने पोलीस ठाण्यात धाव घेत बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला. याचदरम्यान जळालेल्या अवस्थेत एक कार पोलिसांना सापडली आणि त्या जळालेल्या कारमध्येच त्यांच्या जळून खाक झालेल्या मृतदेहाचे अवशेष आढळून आले.

Dr. Suvarna Waje
जितेंद्र आव्हाडांचा बॅाम्ब; नाशिक महापालिकेत ७०० कोटींचा घोळ!

नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांच्याकडून तपासाला गती देण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी डॉ. सुवर्णा वाजे यांच्या बहीण आणि रुग्णालयातील सहकाऱ्यांचे जबाब नोंदवले. डॉ.वाजे यांच्या पतीकडूनही माहिती घेण्यात आली होती. शहरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले. संदीप वाजेचे काॅल डिटेल्स पाहिल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com