Balasaheb Thorat : बाळासाहेब थोरातांना स्वतःच्याच गावातून मिळाला 'घरचा आहेर'; जोर्वेच्या ठरावामुळे राजकारण पेटलं

Jorve village supporting additional tehsil office Ashwi Budruk opposition Congress Balasaheb Thorat : संगमनेरमधील आश्वी बुद्रुक इथं अतिरीक्त तहसील कार्यालयाला विरोध असलेल्या काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांच्या जोर्वे गावाने समर्थनार्थ ठराव केला.
Balasaheb Thorat
Balasaheb ThoratSarkarnama
Published on
Updated on

Sangamner Political News : काँग्रेस नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना त्यांच्याच स्वतःच्या जोर्वे गावाने जोरदार राजकीय धक्का दिला आहे. संगमनेर तालुक्यात असलेले परंतु शिर्डी विधानसभा मतदारसंघात येणारे आश्वी बुद्रुक इथं प्रस्तावित असलेल्या अतिरीक्त तहसील कार्यालयाच्या बाजूने जार्वे ग्रामपंचायतीने ठराव घेतला आहे.

यासाठी बोलवण्यात आलेल्या जोर्वेची ग्रामसभा वादळी झाली. आश्वीच्या प्रस्तावित कार्यालयासाठी जोर्वेमध्ये ठराव मंजूर झाल्याने थोरात यांना स्वतःच्या गावातून घरचा आहेर मिळाला आहे.

बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या जोर्वे गावात, आश्वी इथं प्रस्तावित अतिरीक्त तहसील कार्यालयाच्या समर्थनार्थ ग्रामसभा झाली. या ग्रामसभेत चांगलाच कलगीतुरा रंगला होता. थोरात गटाने कार्यालयाच्या विरोधात ठराव मांडला. परंतु बहुतांश ग्रामस्थांनी विरोध करत कार्यालय झालेच पाहिजे, अशी मागणी लावून धरली. विरोधाचा निषेध केला. आश्वीच्या अतिरीक्त तहसील कार्यालयाच्या मागणीचा ठराव मंजूर करण्यात आला.

Balasaheb Thorat
Namdevshastri Maharaj news : संतोष देशमुखांच्या हत्येची क्रूरता आधी माहित नव्हती; नामदेवशास्त्री म्हणतात, 'अजाणतेपणानं पहिलं विधान'

माजी सरपंच गोकुळ दिघे यांनी यावेळी आक्रमक भूमिका मांडली. मतदारसंघाची फेररचना करताना जोर्वे गावचा समावेश शिर्डी (Shirdi) विधानसभा मतदारसंघात झाला. त्यावेळी बाळासाहेब थोरात यांनी विरोध का दर्शवला नाही, असा प्रश्न केला. त्यावेळी तालुका विभागला जात नव्हता का? संगमनेरमधील काही गावे वगळून प्रस्तावित कार्यालय होणे गरजेचे आहे, कार्यालयासाठी जार्वे गावचा विचार करावा, त्याला ग्रामस्थांचाही पाठिंबा राहिले, असे सांगितले.

Balasaheb Thorat
Washim Guardian Minister : हसन मुश्रीफांची घोषणा घोषणाच राहिली, 800 किलोमीटरचा प्रवास झेपेना; पालकमंत्रिपदाबाबत घेतला मोठा निर्णय

दरम्यान, आश्वी बुद्रुक इथं प्रस्तावित अतिरीक्त तहसील कार्यालयाच्या समर्थनार्थ काही प्रमुख स्थानिक राजकीय पदाधिकारी भूमिका घेत प्रांताधिकारी यांची भेट घेऊन निवेदन दिले. राजकीय भूमिकेतून कार्यालयाला विरोध आहे. संगमनेर इथले तहसील कार्यालय दूर असून, इथं झाल्यास नागरिकांच्या सोयीचे होईल, असे या निवेदनात म्हटले आहे.

आश्वी बुद्रुक इथं प्रस्तावित अतिरीक्त तहसील कार्यालयावरून पालकमंत्री राधाकृष्ण विखे आणि बाळासाहेब थोरात यांच्यात राजकीय संघर्षाचा भडका उडाला आहे. यावरून दोघांच्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. यातच बाळासाहेब थोरात यांच्या जोर्वे गावाने कार्यालयाच्या समर्थनार्थ ठराव मंजूर केल्याने हा राजकीय संघर्ष आणखी भडकणार, अशीच चिन्हं निर्माण झाली आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com