Washim Guardian Minister : हसन मुश्रीफांची घोषणा घोषणाच राहिली, 800 किलोमीटरचा प्रवास झेपेना; पालकमंत्रिपदाबाबत घेतला मोठा निर्णय

Kolhapur NCP minister Hasan Mushrif resigned Guardian Minister Washim Mahayuti : महायुती सरकारमध्ये असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापूरचे नेते मंत्री हसन मुश्रीफ यांनी वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्रिपद सोडले.
Hasan Mushrif
Hasan Mushrif Sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : महायुती सरकारमध्ये पालकमंत्रिपदाचा तिढा डोकेदुखी कायम आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंत्री हसन मुश्रीफ यांनी वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्रिपद सोडले आहे. कोल्हापूर ते वाशिम जिल्हा, असा 800 किलोमीटरपर्यंतचा प्रवास झेपत नसल्याचे सांगत मंत्री हसन मुश्रीफ यांनी पालकमंत्रिपद सोडले.

वाशिम जिल्हाला लागलेला 'झेंडा टू झेंडा' पालकमंत्री हा डाग पुसू आणि जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा देवू, अशी घोषणा हसन मुश्रीफ यांनी ध्वजवंदनाच्या कार्यक्रमात केली होती. मात्र त्यांची ही घोषणा आता फक्त घोषणाच राहिली आहे. क्रीडा मंत्री दत्ता भरणे यांच्याकडे वाशिमचे पालकमंत्रिपद जाणार असल्याची शक्यता आहे.

महायुती सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्त्व कमी करताना भाजपचे (BJP) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूर जिल्ह्याचे पालकमंत्रिपद दिले. यात वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाट्याला आले. कोल्हापूर ते वाशिम जिल्ह्याचे 800 किलोमीटर अंतर होते. या दूरच्या प्रवासावर मंत्री मुश्रीफ यांचा आक्षेप होता.

Hasan Mushrif
Namdevshastri Maharaj news : संतोष देशमुखांच्या हत्येची क्रूरता आधी माहित नव्हती; नामदेवशास्त्री म्हणतात, 'अजाणतेपणानं पहिलं विधान'

मंत्री मुश्रीफ (Hasan Mushrif) कोल्हापूरचे असून, वाशिम जिल्हा त्यांच्या मतदारसंघापासून खूप दूर आहे. मतदारसंघात वेळ देता यावा म्हणून, त्यांनी हे पालकमंत्रिपद सोडले आहे. मंत्री मुश्रीफ यांनी पालकमंत्रिपद सोडताच, महायुतीमधील पालकमंत्रिपदाचा तिढा कायम असल्याचे दिसते. रायगड, नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा तिढा कायम असतानाच, त्यात आता मंत्री मुश्रीफ यांच्या निर्णयाने भर पडली. त्यामुळे हा तिढा वाढणार असल्याचे दिसते.

Hasan Mushrif
Dinvishesh 05 March : काय घडलं होतं त्यावर्षी आजच्या दिवशी, वाचा आजचे दिनविशेष...

दत्ता भरणेंकडे जबाबदारी जाणार

अधिवेशन काळातच मंत्री हसन मुश्रीफ यांनी पालकमंत्रिपद सोडल्याने, त्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी म्हटले आहे. मंत्री मुश्रीफ यांच्या पश्चात वाशिम जिल्ह्याचे जबाबदारी क्रीडा मंत्री दत्ता भरणे यांच्याकडे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज्यात राष्ट्रवादीची कोंडी

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसची पुरती राजकीय कोंडी झाल्याचे सध्याचे चित्र आहे. बीडचे नेते मंत्री धनंजय मुंडे यांनी काल मंत्रि‍पदाचा राजीनामा दिला आहे. नाशिकचे मंत्री माणिकराव कोकाटे कायद्याच्या कचाट्यामुळे अडचणीत सापडले आहेत. यातच मुश्रीफ यांनी पालकमंत्रिपदाची जबाबदारी सोडली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची सध्याच्या राजकारणात पुरती दमछाक होत असल्याचे दिसते आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com