BJP Vs Balasaheb Thorat : '..हे तथाकथित सुसंस्कृतपणाचा बुरखा पांघरून हिंडणाऱ्या थोरातांनी स्पष्ट करावं' ; भाजपने साधला निशाणा!

BJP Shriram Ganpule on Balasaheb Thorat News : बाळासाहेब थोरात यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेली टीकेला, संगमनेरचे शहराध्यक्ष श्रीराम गणपुले यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
Balasaheb Thorat
Balasaheb ThoratSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेली टीका भाजपला चांगलीच जिव्हारी लागल्याचे दिसत आहे. संगमनेरचे भाजपचे शहराध्यक्ष वकील श्रीराम गणपुले यांनी आमदार थोरातांना उपरोधिक सल्ला दिला. आमदार थोरातांना थेट भाजपमध्ये येऊन फडणवीसांची अडचण दूर करण्याचा हा सल्ला दिला. आमदार थोरातांना भाजपचे गणपुले यांनी दिलेला हा अजब सल्ला चर्चेत आला आहे.

भाजपचे (BJP) नेते देवेंद्र फडणवीस यांची केंद्रातील पक्षातील नेत्यांनी राज्यात नको ते उद्योग करायला लावल्याने अडचणीत सापडल्याची टीका आमदार थोरातांनी केली होती. फडणवीस यांच्यावरील ही टीका भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या चांगलीच जिव्हारी लागली. भाजपचे संगमनेरचे शहराध्यक्ष वकील श्रीराम गणपुले यांनी आमचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एवढीच काळजी असेल, तर तुम्ही भाजपमध्ये येऊन त्यांची अडचण दूर करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुमचाही मार्ग मोकळा होईल, असा उपरोधिक सल्ला दिला.

Balasaheb Thorat
Maharashtra Assembly Elections : 'MIM'ने विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर केले उमेदवार; जाणून घ्या, कोणाला दिली उमेदवारी?

याचबरोबर 'आमदार बाळासाहेब थोरात यांचे राजकारण सोयीनुसार असते, हे संपूर्ण राज्य पाहत आहे. एकीकडे काँग्रेसचे (Congress) निष्ठावान म्हणून मिरवून घ्यायचे आणि दुसरीकडे स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी भाजपच्या नेत्यांशी हातमिळवणी करायची, तेव्हा भाजप त्यांना अडचणीचा वाटत नाही.' अशी टीकाही केली.

तसेच 'स्वत:चा भाचा अपक्ष उभा करायचा, त्याच्यासाठी भाजपचा पाठिंबा घ्यायचा, शिक्षक मतदार संघात महाविकास आघाडीच्या उमेदवाराविरुद्ध अपक्ष उमेदवार उभा करायचा, त्याला संस्थात्मक सर्व रसद पुरवायची, सगे-सोयऱ्यांचे राजकारण करुन जिल्ह्यात व पक्षात वजन असल्याचा खोटा आव आणायचा, हे सर्व करणाऱ्या बाळासाहेब थोरातांनी आपल्या पक्षातील झालेली दुर्दशा सुधारण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा', असेही गणपुले यांनी म्हटले.

"देवेंद्र फडणवीस आणि भाजप यांची काळजी करणे म्हणजे, आपले ठेवायचे झाकून आणि लोकाचं पाहायचं वाकून, असा आमदार थोरातांचा प्रयोग असल्याची टीका गणपुले यांनी केली. आमदार थोरातांना भाजपची आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांची विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर अचानक काळजी वाटायला लागणे आणि देवेंद्र फडणवीसांवर अन्याय झाल्याचे वाटणे हे अचानक घडले नाही", अशी शंका देखील गणपुले यांनी व्यक्त केली.

Balasaheb Thorat
Balasaheb Thorat Vs Devendra Fadnavis : फडणवीस चक्रव्युहात कसे अडकले; थोरात म्हणाले, 'नको ते उद्योग केले'

मुलीची संभाव्य आमदारकी धोक्यात? -

'वर्षभर पुढे केलेल्या मुलीची संभाव्य आमदारकी धोक्यात आल्याचं, तर हे लक्षण नाही ना', अशीही शंका त्यांच्या वक्तव्यांतून येऊ लागल्याचंही श्रीराम गणपुले यांनी म्हटलं. देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी खोटी सहानुभूती दाखवून मुलीचे राजकीय भवितव्य सुरक्षित करण्याचा हेतू दिसतो. त्यातूनच देवेंद्र फडणवीस यांची एवढी काळजी बाळासाहेब थोरातांना होती, आहे.

तर 2019 मध्ये दगाफटका करुन, महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री बसविताना 105 घरी बसविल्याचा 108 वेळा जप करुन असूरी आनंद का व्यक्त केला? हे तथाकथित संभावित सुसंस्कृतपणाचा बुरखा पांघरुन हिंडणाऱ्या आमदार थोरातांनी स्पष्ट करावं. 2019 की 2024 मधील बाळासाहेब थोरात खरे याचाही खुलासा संगमनेरच्या सर्वसामान्य जनतेला करण्याचं आवाहन श्रीराम गणपुले यांनी केलं.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com