India US trade war : भारत-रशियाची मैत्री खटकतेय की अन् काही! डोनाल्ड ट्रम्प आणखी मोठा झटका देण्याच्या तयारीत...

Donald Trump Warns of Further Hike in 25% Import Duty on India : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 25 टक्के आयातशुल्क लादले आहे. परंतु या शुल्कात आणखी वाढ करण्याचा इशारा दिला आहे.
Donald Trump
Donald TrumpSarkarnama
Published on
Updated on

Donald Trump India trade : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 25 टक्के आयातशुल्क लादले आहे. परंतु या शुल्कात आणखी वाढ करण्याचा इशारा दिला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांना देखील भारताकडून जशास-तसं उत्तर दिलं जात आहे. पण पुन्हा आयातशुल्क वाढीचा इशारा दिल्यानं डोनाल्ड ट्रम्प यांना भारताविषयी नेमकं काय खटकतंय, भारत-रशिया मैत्री की अन् काही, याची चर्चा सुरू आहे.

लोकसभेचं पावसाळी अधिवेशन दिल्लीत सुरू आहे. पाकिस्तानस्थित दहशतवाद्यांविरोधात राबवलेल्या ऑपरेशन सिंदूर कसं यशस्वीपणे राबवलं याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) देत असतानाच, डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 25 टक्के आयातशुल्क वाढवलं.

पहलगामवरील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानस्थिती दहशतवादाविरोधात 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) राबवलं. पाकिस्तानने यानंतर भारताविरोधात युद्ध पुकारलं. भारताने देखील पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिलं. हे युद्ध आपण थांबवल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. परंतु भारताने ट्रम्प यांचा दावा फेटाळला आहे. यानंतर लगेचच ट्रम्प यांनी भारतावर 25 टक्के आयातशुल्कचा निर्णय लादला.

Donald Trump
BJP And Shiv Sena Alliance Trouble : उद्धव-राज युती; भाजपचं गणित फिस्कटतंय, तर शिंदे शिवसेनेसाठी धोका!

डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयाला भारताकडून जशास तसं उत्तर देण्यात आलं. अमेरिकेकडून भारत एफ-35 फायटर जेट विमानांची खरेदी करणार होता. पण टेरिफ वॉरमुळे आता भारताने कठोर पवित्रा घेत अमेरिकेसोबत ही डील न करण्याचा निर्णय घेतल्याचं समोर आलं आहे. परंतु यानंतरही डोनाल्ड ट्रम्प यांनी आयातशुल्कात आणखी वाढ करण्याचा इशारा दिला आहे.

Donald Trump
Meghana Bordikar BJP : ग्रामसेवकाला दमबाजीचा व्हिडिओ; कार्यक्रमामागे अजितदादांच्या पक्षाचा नेता? मंत्री बोर्डीकरांनीच सांगितली 'इनसाइड स्टोरी'

आयातशुल्क पुन्हा वाढ करण्याचा इशारा देताना ट्रम्प यांनी, ‘‘भारत हा रशियाकडून केवळ तेलखरेदीच करत नाही, तर खुल्या बाजारात त्याची विक्री करून प्रचंड नफाही मिळवत आहे,’’ असा आरोप त्यांनी केला. ट्रम्प यांनी गेल्या आठवड्यात भारत आणि रशियादरम्यान असलेल्या मैत्रीच्या संबंधांवरून टीका करताना दोन्ही देशांना ‘मृत अर्थव्यवस्था’ म्हटले होते.

तसेच, भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याबद्दल दंडही आकारण्याचा, ट्रम्प यांनी इशारा दिला होता. भारताने मात्र रशिया हा आमचा जुना आणि विश्‍वासार्ह मित्र असल्याचे स्पष्ट केले होते. ट्रम्प यांनी आज पुन्हा एकदा भारतावर आरोपांचे वार करताना आयातशुल्कात मोठी वाढ करण्याचा इशारा सोशल मीडियाद्वारे दिला आहे.

‘‘भारत हा रशियाकडून तेल खरेदी तर करतोच, पण त्यापैकी बराच हिस्सा खुल्या बाजारात विक्रीही केला जातो. यातून भारत मोठा नफा कमावितो. रशियामुळे युक्रेनमध्ये कितीतरी माणसे मारली जात आहेत, याची त्यांना काहीही काळजी वाटत नाही. म्हणूनच, भारतातून आयात होणाऱ्या वस्तूंवरील शुल्कात मी मोठी वाढ करणार आहे,’’ असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. अमेरिका आणि भारत यांच्यातील व्यापारात मोठी तूट असून याचा अमेरिकालाच मोठा फटका बसत असल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा आरोप आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com