Balasaheb Thorat vs Vikhe Patil : कट्टर विरोधक विखे पाटलांना थोरातांचे पत्र; कारण की...

Balasaheb Thorat Writes to Radhakrishna Vikhe on Nilwande Dam Issue in Sangamner Ahilyanagar : माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कट्टर विरोधक अहिल्यानगरचे भाजपचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांना पत्र लिहिलं आहे.
Balasaheb Thorat vs Vikhe Patil
Balasaheb Thorat vs Vikhe PatilSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकीय पटलावरील कट्टर विरोधक म्हणून, विखे पाटील अन् थोरातांकडे पाहिलं जातं. राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीचं राजकारण सुरू झाल्यापासून विखे पाटील-थोरात यांच्यातील राजकीय विरोध टोकापर्यंत होता.

लोकसभा अन् विधानसभा निवडणुकीच्या काळात हा विरोध कमालीचा वाढला होता. हा राजकीय विरोध असला, तरी लोकहिताच्या कामात, सहकारात तो कधीही आडवा येत नाही, याचा देखील या दोघांनी वेळोवेळी प्रत्यय दिला आहे. यातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजप पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना पत्र लिहिल्याचं समोर आलं आहे.

काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी भाजपचे अहिल्यानगर जिल्ह्याचा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना पत्र लिहिले आहे. निळवंडे धरणाच्या कालव्यातून ओव्हरफ्लोचे पाणी तातडीने सोडावं, अशी प्रमुख मागणी त्यांनी केलं आहे. भंडारदरा आणि निळवंडे धरणात पाण्याची समाधानकारक उपलब्धता. यातील अतिरीक्त पाणी सोडल्यास त्याचा फायदा, अहिल्यानगर जिल्ह्यातील दुष्काळी भागाला होईल, असेही थोरात यांचे म्हणणे आहे.

या धरणांतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग नदीमार्गे होत असल्याचे थोरातांनी मंत्री विखे यांचे लक्ष वेधलं आहे. मात्र दुसरीकडे निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रात अद्यापही पुरेसा पाऊस न झाल्याने डाव्या आणि उजव्या कालव्यातून तातडीने पाणी सोडावे, अशी प्रमुख मागणी थोरातांनी मंत्री विखे पाटलांकडे (Radhakrishna Vikhe) केली आहे.

Balasaheb Thorat vs Vikhe Patil
Maharashtra Live Updates : आमदार गायकवाड त्यांच्या कृत्यावर ठाम; म्हणाले, 'मी जे केलं ते मला मान्य'

थोरात अन् विखे पाटील यांच्यामधील राजकीय संघर्ष लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या काळात तीव्र झाला होता. महाविकास आघाडीने अहिल्यानगर दक्षिण मतदारसंघात डाॅ. सुजय विखे पाटील यांचा पराभव केला. यात बाळासाहेब थोरात यांनी किंगमेकरची भूमिका निभावली.

Balasaheb Thorat vs Vikhe Patil
Karnataka Congress : कर्नाटकमध्ये राजकीय उलथापालथ; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर, राहुल गांधींना भेटणार

सहकारात थोरात-विखेंची युती

या पराभवाचा वचपा विधानसभा निवडणुकीत विखे पिता-पुत्रानं घेतला. थोरातांना संगमनेरमध्ये घेरत, तिथं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नवखे उमेदवार अमोल खताळ यांना निवडून आणलं. या निवडणुकीनंतर मात्र दोघांनी राजकीय शांतता बाळगणं पसंद केले. थोरात अन विखे सहकारी कारखाना निवडणुकीत त्याचा प्रत्यय आला. दोन्ही कारखान्यांची निवडून बिनविरोध झाली.

मंत्री विखे थोरातांच्या पत्राची दखल घेणार का?

निळवंडे धरणाचं कामाच्या श्रेयावरून देखील थोरात अन् विखेंमध्ये जुगलबंदी रंगते. याच निळवंडे धरणातील पाण्याचा ओव्हरफ्लोच्या पाणीसंदर्भात थोरात यांनी मंत्री विखे पाटलांना पत्र लिहून लक्ष वेधलं आहे. मंत्री विखे पाटलाकंडून थोरातांच्या या पत्राची दखल कशी घेतली जाते, आता याकडे लक्ष लागलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com