
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवास इथल्या कँटीनमध्ये केलेल्या मारहाणीच्या मुद्यावर ठाम आहेत. "निकृष्ट जेवण दिलेलं नाही, तर ते सडलेलं, विषारी जेवण होतं. आमच्या आरोग्याशी खेळ खेळतात. जाब विचारल्यावर तिथले कर्मचारी मुजोरी करतात. त्यानंतरच माझी तिथल्या कर्मचाऱ्यांवर झालेली ती माझी प्रतिक्रिया होती", असं आमदार गायकवाड यांनी म्हटलं आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार गायकवाड यांच्याविरोधात कारवाईचे संकेत दिले आहे.
भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची आज मुंबई (Mumbai) इथं माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी भेट घेतली. पक्ष संघटनेतील एका अत्यंत महत्त्वाच्या आणि जबाबदारीच्या पदाची सूत्रे स्वीकारल्याबद्दल अभिनंदन करत, आगामी वाटचालीसाठी विखे पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. विखे पाटील यांची भाजपच्या महाराष्ट्र राज्य परिषदेचे सदस्य (2025-28) म्हणून निवडीबद्दल प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला केलेली मारहाण केल्याचं कृत्य चुकीचे आहे, असे विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटले. सगळ्या आमदारांविषयी लोकांमध्ये वेगळी भावना जाते. त्यामुळे कारवाई होणे गरजेचे आहे. अध्यक्ष अन् सभापतींनी याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
मुंबईतील हक्काच्या घरासाठी गिरणी कामगारांसाठी मनसेने (MNS) आंदोलनाचा हत्यार उपसलं आहे. या आंदोलन मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे, खासदार अरविंद सावंत, आमदार सचिन अहिर यांच्यासह प्रमुख नेते सहभागी झाले आहेत.
कोल्हार (ता.राहाता) इथं विक्रीच्या उद्देशाने गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतूस बाळगणाऱ्याला स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी (Police) अटक केली. अक्षय राजेंद्र पायमोडे (वय 26, रा.प्रवरानगर, लोणी, ता.राहाता) याला अटक केली आहे, तर अनिकेत देवेंद्र भोसले (रा.प्रवरानगर, लोणी, ता.राहाता) हा पसार झाला आहे. 49 हजार रुपये किंमतीचे गावठी पिस्तूल, दोन हजारांचे दोन जिवंत काडतूस आणि 10 हजारांचा मोबाईल, असा एकूण 61 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघर इथं सीपीएमचा 'रास्ता रोको' आंदोलन केले. सीपीएमचे डहाणूचे आमदार विनोद निकोले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. महामार्गाची दुरावस्था , कामगार (Workers) विरोधी चार श्रम संहिता रद्द करा , विशेष जनसुरक्षा विधेयक मागे घ्या , सर्व कामगारांना 26 हजार रुपये किमान वेतन आणि दहा हजार रुपये पेन्शन लागू करा, शेतकऱ्यांना 12 तास अखंडित वीज पुरवठा द्या , विजेची नवीन स्मार्ट मीटर योजना रद्द करा, यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनामुळे मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.
बीडच्या (BEED) केज तालुक्यातील एका 16 वर्षांच्या शाळकरी मुलीचा वर्षभर पाठलाग करणाऱ्या ऋषिकेश रामभाऊ गलांडे ऊर्फ सचिन या युवकावर पोलिसांनी कारवाई केली आहे. शाळेत येता-जाता बॅग खेचणे, हात पकडून ओढणे, धमक्या देणे आणि दुचाकीने कट मारून दहशत निर्माण करणे, असे प्रकार सुरू होते. 'बोर्ड परीक्षा देऊ देणार नाही' अशी धमकी देणाऱ्या या युवकाविरोधात मुलीच्या धैर्यामुळे पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या छळामुळे मानसिक तणावात असलेल्या मुलीने आईला सांगून तक्रार दाखल केली.
शिवसेना (Shivsena) आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासातील कॅन्टीन कर्मचाऱ्याला बेदम मारहाणीवरून वाद उफळला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे आमदार सचिन अहिर यांनी या कृत्यावर राज्याचे मुख्यमंत्री आता काय कारवाई करतात, ते बघू, असा टोला लगावला आहे. हेच जर विरोधी पक्षाचा आमदार असता, तर लगेच कारवाई झाली असती, त्यांना भावना अयोग्य होत्या असं म्हणता येणार नाही. पण पद्धत चुकीची होती, असा घणाघात सचिन अहिर यांनी म्हटले आहे.
बिहारमधील सरकारी नोकऱ्यांमधील महिलांसाठीच 35 टक्के राखीव जागा केवळ स्थानिक रहिवाशांसाठीच मर्यादित असतील, अशी घोषणा मंत्रिमंडळात बैठकीत केली. सरकारी नोकऱ्यांमध्ये अधिवास धोरण लागू करण्याची मागणी राज्यात वाढत असून, विधानसभा निवडणुकीला (Election) काहीच महिने शिल्लक असताना हा निर्णय घेण्यात आला आहे.
उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याविरोधात मार्चमध्ये महाविकास आघाडीने (MVA) आणलेल्या अविश्वास ठरावाचे काय झाले, असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे नेते अनिल परब यांनी केला. सभापती प्रा. राम शिंदे यांनी त्या ठरावाची सद्यःस्थिती लवकरच सांगितली जाईल, असे सांगितले. पक्षांतरबंदी कायद्यानुसार उपसभापती गोऱ्हे यांच्याविरोधात अपात्र ठरविण्यासाठी ठराव विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह महाविकास आघाडीच्या दहा सदस्यांनी दिला आहे.
'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) दरम्यान पाकिस्तानने भारताचे राफेल लढाऊ विमान पाडले नाही, अशी ग्वाही 'दसाॅल्ट एव्हिएशन'चे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एरिक ट्रॅपियर यांनी दिली. फान्समधील 'अॅव्हियां द चेस', या संकेतस्थळाने यासंबंधी वृत्त दिलं आहे. उंचावरील तांत्रिक अडचणीमुळे एक राफेल विमान पडले, मात्र शत्रूच्या माऱ्यात एकाही राफेल विमानाचे नुकसान झालेले नाही, असे ट्र्रॅपियर म्हटले आहे.
राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार परख या राष्ट्रीय मूल्यांकन संस्थेमार्फत करण्यात आलेल्या चार डिसेंबर 2024रोजी देशपातळीवर केलेल्या सर्वेक्षणात महाराष्ट्राने (Maharashtra) देशात आठवे स्थान पटकावलं आहे. 2021च्या तुलनेत 2024मध्ये सरासरी तीन टक्क्यांनी वाढ झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.