

Sangamner political news : शिवसेना मुख्य नेता, माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागताचा 'हायव्होल्टेज ड्रामा' संगमनेर इथं पाहायला मिळाला.
शिवसेनेचे स्थानिक आमदार अमोल खताळ आणि नाशिक पदवीधरचे अपक्ष आमदार सत्यजीत तांबे यांच्यात हा ड्रामा रंगला होता. आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या स्वागतात जोरदार घोषणाबाजी केली.
निवृत्ती देशमुख तथा इंदुरीकर महाराज यांच्या कन्येचा आज संगमनेर (Sangamner) इथं विवाह होत आहे. या विवाह सोहळ्याला राज्यातील राजकीय, प्रशासकीय, राज्यातील कीर्तनकार महाराज यांना आमंत्रित करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या विवाह सोहळ्याला हजेरी लावली.
उपमुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) हे हेलिकाॅप्टरमधून येणार होते. या वेळी हेलिपॅटवर त्यांच्या स्वागतासाठी जोरदार तयारी करण्यात आली होती. आमदार अमोल खताळ आणि आमदार विठ्ठल लंघे हे दोघेही तिथं उपस्थित होते. याचवेळी आमदार सत्यजीत तांबे आणि त्यांच्या पत्नी नगराध्यक्ष मैथिली तांबे आणि समर्थक देखील हेलिपॅटवर आले होते.
कट्टर राजकीय विरोधक आपल्या नेत्याच्या स्वागतासाठी हेलिपॅटवर पोहोचल्याने आमदार खताळ, आमदार लंघे आणि त्यांचे समर्थक सावध झाले. हेलिकाॅप्टर हेलिपॅटवर येताच, उपमुख्यमंत्री शिंदे हेलिकाॅप्टरमधून उतरताच, त्यांच्या स्वागतासाठी खताळ आणि लंघे दोघेही धावले. त्याचबरोबर समर्थकही त्यांच्यामागे धावले.
खताळ अन् लंघे आणि त्यांचे समर्थक हेलिपॅटवरील उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या दिशेने एकाचवेळी धावल्याने, पोलिस सावध झाले. कार्यकर्त्यांना मजाव केल्याने त्यात खताळ अन् लंघे दोघेही अडकले. यावरून काहीचा वाद झाला. या सर्वावर मात करत खताळ आणि लंघे यांनी सर्वात अगोदर आपल्या नेत्याचे पुष्पगुच्छ देत स्वागत केले.
उपमुख्यमंत्री शिंदे हे यानंतर वाहनाच्या ताफ्याकडे निघाले, तिथून त्यांना विवाह सोहळ्यासाठी जायचे होते. या वेळी आमदार खताळ जोरदार घोषणाबाजी करत होते. वाहनाच्या ताफ्याकडे उपमुख्यमंत्री शिंदे पोहोचताच, तिथे आमदार तांबे आणि त्यांचा पत्नी मैथिली तांबे उपस्थित होते.
तांबे दाम्पत्यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांना वाकून नमस्कार केला. या वेळी तांबे समर्थक उपस्थित होते. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी तांबे दाम्पत्याचे स्वागत स्वीकारल्यानंतर ते वाहनाने इंदुरीकर महाराज यांच्या कन्येच्या विवाह स्थळाकडे रवाना झाले. मात्र यानिमित्ताने खताळ अन् तांबे यांच्यात शिंदे स्वागताचा रंगलेल्या 'हायव्होल्टेज ड्रामा'ची चर्चा संगमनेरमध्ये रंगली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.