Balasaheb Thorat : संगमनेरच्या मोर्चात थोरातांचं 'लाव रे तो व्हिडीओ'...भडारेंची पोलखोल

Balasaheb Thorat : संगमनेरमधील सभेत थोरातांनी किर्तनकार भंडारेंचे व्हिडीओ दाखवले. भडारेंचे किर्तन राजकीय दृष्टीने प्रेरित होतं. सर्व काही ठरवून केलं गेलं असा आरोप बाळासाहेब थोरात यांनी केला.
Balasaheb Thorat
Balasaheb ThoratSarkarnama
Published on
Updated on

Balasaheb Thorat : हिंदुत्ववादी कीर्तनकार संग्रामबापू भंडारे यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना नथुराम गोडसे स्टाईलने जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर संगमनेरमधील राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. थोरात समर्थकांनी धमकी विरोधात आज(दि. २१)संगमनेरमध्ये शांती मोर्चा काढला. या मोर्चा दरम्यान भाषण करताना बाळासाहेब थोरात यांनी 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत काही व्हिडीओ फूटेज दाखवले आणि संग्रामबापू भंडारे यांनी केलेला मारहाणीचा दावा खोटा असल्याचं म्हटलं.

संगमनेरमध्ये थोरात यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या मोर्चात महाविकास आघाडीचे काही नेतेही सहभागी झाले होते. यावेळी आपल्या भाषणातून थोरात यांनी राज्यातील सत्ताधारी सरकार, पोलिस यंत्रणा यांच्यासह कीर्तनकार भंडारे यांच्यावर टीकास्त्र सोडले. गेल्या काही महिन्यांपासून संगमनेरमधील वातावरण दूषित करण्याचे काम सुरु आहे. संगमनेरपासून यांनी सुरुवात केली आहे, त्यांना संपूर्ण राज्यातील वातावरण खराब करायचं आहे. खरं काय झालं हे आता महाराष्ट्राला कळणार आहे, कारण त्याचे व्हिडीओ आपल्याकडे आहे. हा भंडारे नेमकं कसं नाटक करतोय, तो कुणाचं कसं हत्यारं बनलाय ते पाहा असं थोरात म्हणाले..

त्यानंतर थोरात यांनी मोर्चातील सभेत काही सीसीटीव्ही फुटेज लोकांना दाखवले. हे प्रकरण घडलं त्यावेळी महाराष्ट्रातल्या अनेकांनी एकांगी प्रतिक्रिया दिल्या. त्या थोरातांनी दाखवल्या. संग्राम भंडारे यांची गाडी फोडण्याचा आरोप खोडताना त्यांनी व्हिडीओ दाखवला. त्यात कीतर्नकार भंडारे यांची कार संगमनेरमध्ये आली त्याचवेळी ती फुटलेली होती, असा दावा सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे त्यांनी केला. भंडारे यांच्या कारचे संगमनेरमध्ये प्रवेश करतानाचे टोल नाक्यावरील सीसीटीव्ही फूटेज स्क्रीनवर दाखवण्यात आले.

Balasaheb Thorat
Balasaheb Thorat : संगमनेरच्या शांती मोर्चातून बाळासाहेब थोरातांची गर्जना, आता अमृतसेना तयार करावी लागणार..

त्यानंतर शनिवारी, 16 ऑगस्ट रोजी ज्या ठिकाणी हा वाद झाला त्या घुलेवाडीत कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांच्या कारमधून भंडारे घुलेवाडीत आले. भंडारे आले एका गाडीतून पण दुसऱ्या कारमधून ते परत गेले असल्याचा दावा यावेळी करण्यात आला. 16 ऑगस्ट रोजी झालेल्या कीर्तनाच्या वेळी भंडारे आणि त्यांच्या काही समर्थकांनी जाणीवपूर्वक गोंधळ घातल्याचे व्हिडीओतून दावा करण्यात आला. त्यामुळे आपण हल्ले केले नाही गाडी आधीच फुटलेली होती, केस दाखल करण्यासाठी ती आणखी फोडण्यात आली असा आरोप थोरातांनी यावेळी केला.

कीर्तनादरम्यान गोंधळ निर्माण झाल्यानंतर भंडारे मागच्या मार्गाने बाहेर गेले. त्या वेळी त्यांच्या सोबत काही सहकारी उपस्थित होते. यावेळी कोणतीही धक्काबुक्की झाल्याचे चित्र सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळत नसल्याचे थोरात यांनी स्पष्ट केले. याउलट एका श्रोत्याशी वाद घालत त्याला मारण्यासाठी संग्राम भंडारेंचे लोक मारायला धावले असा दावा त्यांनी फुटेज दाखवून केला.

Balasaheb Thorat
Best Society Election Result: BEST सोसायटीत ठाकरे बंधूंचा पराभव का झाला? छगन भुजबळ यांनी केले अचुक विश्लेषण...

या जगातील सर्वात खोटं वाक्य म्हणजे सर्वधर्मसमभाव हे आहे. खोटारडं व घाणेरडं वाक्य आहे. असं भंडारे किर्तनातून बोललण्याचे व्हिडीओ थोरातांनी दाखवले. याचा अर्थ यांना राज्यघटना मान्य नाही असं आहे. कीर्तन सेवा देताना जागा सोडली जात नाही भंडारे हे लोकप्रतिनिधी आले की जागा सोडतात आणि लोकप्रतिनिधींच्या पाया कसे पडतात याचे व्हिडीओ थोरातांनी दाखवला. गळ्यात विना असताना सर्वसाधरण माणसाच्या पाया पडणारे महाराज धर्माचा अपमान करत नाही का असा सवाल उपस्थित केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com