

Ahilyanagar News: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारसरणी छत्रपती शिवाजी महाराज-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांवर आधारलेली आहे. अजितदादाही नेहमी त्यांच्या भाषणात ही बाब ठणकावून सांगतात. भाजपसोबत सत्तेत राहूनही आपण शाहू-फुले-आंबेडकर सोडली नसल्याचं सांगतात. पण अहिल्यानगर शहरातील त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी पक्षाच्या या विचारसरणीलाच छेद देत आक्रमक हिंदुत्व स्वीकारलं आहे. हेच आमदार जगताप आता अडचणीत आले असून त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी कट्टर हिंदुत्त्वाचा पुरस्कार आणि प्रचार करताना अधिकच आक्रमक घेतली आहे. हीच भूमिका पक्षाचे सर्वेसर्वा अजित पवारांसाठी दिवसेंदिवस डोकेदुखी बनत चालली आहे. त्यांनी जगतापांचे कानही टोचले. पण जगताप यांनी त्यांची वाट बदलली नाही. आता याच जगतापांविरुद्ध अकोल्यात गुन्हा दाखल झाला आहे.
अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांच्याविरोधात धार्मिक तेढ निर्माण करत भावना दुखावल्याच्या गंभीर आरोपांमुळे त्यांच्यावर थेट फौजदारी खटला दाखल करण्यात आला आहे. या खटल्याची शुक्रवारी (ता.21) अकोला न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर आता पुढची तारीख 12 डिसेंबर असणार आहे.
अकोल्यातील प्रसिद्ध समाजसेवक आणि कच्छी मेमन बिरादरीचे अध्यक्ष जावेद जकरिया यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. आमदार संग्राम जगताप यांनी करमाळा इथं झालेल्या सभेत हिंदुत्वाच्या मुद्यावर आक्रमक भूमिका मांडत दिवाळीची खरेदी करताना, हिंदूंकडून करा, असं थेट आवाहन केलं होतं. यावरून पुन्हा वाद वाद चिघळण्याची शक्यता आहे.
जावेद जकरिया यांनी न्यायालयाकडे दाखल केलेल्या अर्जात आमदार संग्राम जगताप यांच्यावर गंभीर कलमं दाखल करत दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी केली आहे. तसेच जगताप या वक्तव्यामुळे अकोला शहर आणि जिल्ह्यातही गंभीर पडसाद उमटल्याचं जकेरिया यांनी म्हटलं आहे. पोलीस प्रशासन आणि विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार देऊनही कोणतीही कारवाई झाली नसल्याचं सांगितलं.
अजित पवारांनी (Ajit Pawar) थेट संग्राम यांना सुनावलं आहे. वडिलांचं छत्र राहिलं नसल्याची आठवण करून देत, जबाबदारीने वागलं आणि बोललं पाहिजे. हा शिव-फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र सर्वांना पुढे घेऊन जाणारा आहे, अशा शब्दात अजितदादांनी संग्राम जगताप यांचे कान टोचले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.