Shalarth ID Scam : अटकेतील भाजप नेत्याला हॉस्पिटलमध्येच ठेवण्याची धडपड : 160 कोटींच्या घोटाळ्याचं चौकशीत बिंग फुटण्याची भीती

Sanjay Garud, Shalarth ID Scam : शालार्थ आयडी घोटाळ्यात नाशिक पोलिसांनी अटक केलेले भाजप नेते संजय गरुड यांनी आता सिव्हिल हॉस्पिटलचा सहारा घेतला आहे.
Sanjay Garud, Shalarth ID Scam
Sanjay Garud, Shalarth ID ScamSarkarnama
Published on
Updated on

Sanjay Garud : शिक्षण क्षेत्राला हादरवून सोडणाऱ्या शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी शेंदुर्णी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तथा जळगाव जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी संजय गरुड यांना नाशिक पोलिसांनी अटक केली. मात्र, ते सध्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल झालेले आहे.

राजकीय पाठबळ, शिक्षण क्षेत्रातील प्रभाव आणि सामाजिक वर्तुळातील दबदबा यामुळे अटकेपासून बचाव होईल, असे गरुड यांना वाटत होते. परंतु पोलिसांनी त्यांना अटक केली असून याप्रकरणात त्यांचा गंभीर आणि नियोजित कट रचण्यात सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

अटक करण्यात आलेला संजय गरुड याच्या ताब्यातील १५ शालेय संस्थांमधील एकूण १७७ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कोणतेही वैयक्तिक मान्यतेचे प्रस्ताव शिक्षणाधिकारी कार्यालयात प्राप्त झालेले नसतानाही त्यांना बनावट वैयक्तिक मान्यता प्रदान करण्यात आल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. १७७ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे बनावट शालार्थ आयडी तयार करत शासनाची कोट्यवधींची फसवणूक करण्यात आल्याचं तपासातून समोर आलं आहे.

Sanjay Garud, Shalarth ID Scam
Shalarth ID Scam : गिरीश महाजनांचा प्रचारकच निघाला 160 कोटींच्या घोटाळ्याचा आरोपी : विधानसभेपूर्वीच भाजपप्रवेश करून उभी केली होती तगडी यंत्रणा

दरम्यान, चौकशीदरम्यान गरुड यांना हृदयविकाराचा त्रास जाणवू लागल्याने तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. संजय गरुड सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. पंरतु पोलिस कोठडी टाळण्यासाठी गरुड अॅडमिट झाल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. या शालार्थ आयडी घोटाळ्यात आपला हात असलेल्या बड्या राजकीय नेत्यांची नावे उघड होऊ नयेत म्हणून गरुड यांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा नाशिक आणि जळगावमध्ये सुरू आहे. गरुड यांनी पोलिसांपुढे बिंग फोडू नये म्हणून त्यांना वाचवण्यासाठी राजकीय यंत्रणा कामाला लागल्याची माहिती सूत्रांनी दिली.

गुन्हा दाखल झाल्यापासून संजय गरुड हा अटक टाळण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते येथील एका फार्महाऊसवर लपून राहिला होता. गोपनीय बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुन्हे शाखेला त्याचा सुगावा लागला. सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने नातेपुते येथे जाऊन छापा टाकला आणि आरोपीला ताब्यात घेतलं.

Sanjay Garud, Shalarth ID Scam
School ID Scam : धक्कादायक! घोटाळ्यातील ८४१ पैकी ६३८ बोगस शिक्षक जळगावचे? अटक होताच भाजप नेता रुग्णालयात!

मात्र, आता गरुड यांनी आता हॉस्पिटलचा साहारा घेतला आहे. गरुड यांना नेमकं कोण वाचवतंय? यावरून आता राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू आहे. गरुड यांना आपला खाक्या दाखवून पोलिस सत्य वदवून घेतात की तपास राजकीय दबावात अडकणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com