Uddhav Thackeray News: नाशिकमधून उद्धव ठाकरेंच्या 'फायरब्रँड' नेत्यानं थेट PM मोदींच्या हिंदुत्वालाच ललकारलं; म्हणाले...

Uddhav Thackeray Vs Narendra Modi: पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात गुजरातमध्ये जाऊन टीका केल्याने पंतप्रधान मोदी अस्वस्थ झाले असावेत. यातूनच त्यांनी राजकीय इर्षेने ही कारवाई झाली आहे. यासंदर्भात देशभरात एक वेगळा संदेश पुन्हा एकदा गेला आहे.
Uddhav Thackeray, Narendra modi
Uddhav Thackeray, Narendra modiSarkarnama
Published on
Updated on

Nashik News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गंभीर टीका केली आहे. पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली की 'ईडी'ची कारवाई होते. याबाबत खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुनरुचार केला आहे.

ईडीने नॅशनल हेराल्ड वृत्तपत्र संदर्भात काँग्रेस नेते राहुल गांधी आणि श्रीमती सोनिया गांधी यांच्यावर कारवाई केली आहे. दिल्ली लखनऊ सहित विविध ठिकाणच्या ६६१ कोटींच्या मालमत्ता ईडीने ताब्यात घेतल्या. त्यामुळे या कारवाईला राजकीय वास येत आहे.

या संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर टीका केली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन नुकतेच अहमदाबाद येथे झाले. या ठिकाणी राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर गंभीर टीका केली होती. त्यामुळेच ही कारवाई झाल्याचे राऊत म्हणाले.

Uddhav Thackeray, Narendra modi
Tanisha Bhise Death Case : डॉ.सुश्रुत घैसास यांचा पाय आणखी खोलात; मेडिकल कौन्सिलनं अखेर मोठं पाऊल उचललं, घेतला 'हा' निर्णय

पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात गुजरातमध्ये जाऊन टीका केल्याने पंतप्रधान मोदी अस्वस्थ झाले असावेत. यातूनच त्यांनी राजकीय इर्षेने ही कारवाई झाली आहे. यासंदर्भात देशभरात एक वेगळा संदेश पुन्हा एकदा गेला आहे. राजकीय सुडाच्या कारवाईला जनता चांगली ओळखून आहे.

देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात नॅशनल हेराल्ड हे वर्तमानपत्र सुरू केले होते. त्याचा ऐतिहासिक संदर्भ देखील भाजप विचारात घ्यायला तयार नाही. केवळ टीका झाली म्हणून राजकीय सुडापोटी कारवाई केली जाते.

Uddhav Thackeray, Narendra modi
Girish Mahajan Vs Khadse: IAS महिला अधिकाऱ्याशी संबंधांचा आरोप जिव्हारी; मंत्री महाजनांनी खडसेंना खेचलं थेट कोर्टात; पहिलं पाऊलही टाकलं

कुख्यात दहशतवादी आणि मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी दाऊद इब्राहिम याच्या मालमत्तेला मुंबईत क्लीन चीट देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यावर गंभीर आरोप आहेत. त्यांनी दाऊद शी संबंधित संपत्ती खरेदी केली होती. ही संपत्ती जप्त करण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने भाजपला पाठिंबा देताच त्यांना क्लीन चिट देण्यात आली.

भारतीय जनता पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतल्यावर ज्या अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. हे आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. मात्र भाजपला पाठिंबा देताच त्यांची ही संपत्ती परत करण्यात आली. भाजप हा सत्तेत आल्यानंतर पुन्हा एकदा त्याच्यात इर्षा आणि सत्तेचा गर्व आला आहे. यातूनच ते अनेक गंभीर चुका करीत आहेत. विरोधी पक्षाच्या नेत्यांना आणि पक्षांना विविध कारस्थाने करून रोखण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. हे फार काळ चालणार नाही, असा दावाही त्यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com