Sanjay Raut : पुढच्या तारखेला हजर न राहिल्यास राऊतांविरोधात काढणार पकड वारंट

Dada Bhuse-Sanjay Raut News : मालेगाव येथील गिरणा कारखान्यात दादा भुसेंनी यांनी 178 कोटींचा भ्रष्टचार केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता.
Sanjay Raut - Dada Bhuse
Sanjay Raut - Dada BhuseSarkarnama
Published on
Updated on

Malegaon Political News : मानहानी प्रकरणात खासदार संजय राऊत यांना आज (ता.4) मालेगाव अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने हजर राहण्याचे आदेश दिले होते. पण दोन वेळा ते न्यायालयात हजर न राहिल्यामुळे न्यायालयाकडून त्यांना आता पकड वॉरंट काढण्याची शक्यता नाकारता येत नाही. तशा सूचनाही न्यायालयाने त्यांना दिल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी संजय राऊत यांच्यावर अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला आहे. या प्रकरणी आतापर्यंत त्यांना दोनदा न्यायालयात हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, दोन्ही वेळा ते गैरहजर राहिले.

Sanjay Raut - Dada Bhuse
Gram Panchayat Election : ‘काय झाडी...काय डोंगार’फेम शहाजीबापू भावकीतून मिळालेले चॅलेंज परतवून लावणार?

मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) पार्श्वभूमीवर गावबंदी करण्यात आल्यामुळे न्यायालयात हजर राहणे शक्य नसल्याचा राऊत यांच्या वकिलाने न्यायालयात अर्ज दिला. मात्र, न्यायालयाने तो अर्ज नामंजूर करत राऊतांविरोधात जामीनपात्र वारंट काढले आहे. तसेच पुढच्या तारखेला हजर न राहिल्यास काढणार पकड वारंट काढण्याच्या सूचनाही दिल्या.

२३ ऑक्टोबरला संजय राऊत (Sanjay Raut) यांना मालेगाव (Malegaon) जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश दिले होते, पण दसरा मेळावा असल्याने गैरहजर राहण्याची परवानगी मिळावी, असा विनंती अर्ज त्यांनी केला होता. त्यामुळे त्यांना आज (ता. ४) हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या, पण आजही ते न्यायालयात हजर राहू शकले नाहीत.

काय आहे प्रकरण ?

मालेगाव येथील गिरणा कारखान्यात दादा भुसेंनी यांनी 178 कोटींचा भ्रष्टचार केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. या बदनामीप्रकरणी दादा भुसेंनी राऊत यांच्या विरोधात मालेगाव कोर्टात मानहाणीचा दावा दाखल केला. संजय राऊत यांनी काही महिन्यांपूर्वी मालेगावमध्ये झालेल्या सभेत दादा भुसेंवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर दै.सामना या वृत्तपत्रातून दादा भुसे यांनी गिरणा सहकारी साखर कारखान्यात 178 कोटी रुपयांच्या शेअर्स घोटाळा केल्याचा आरोप केला होता, पण दादा भुसेंनी हे आरोप फेटाळून लावत राऊतांवर मालेगावच्या मा.अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात मानहाणीचा खटला दाखल केला. दै.सामना वर्तमानपत्रातून बदनामी केल्याचा दादा भुसेंनी राऊतांवर आरोप केला आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Sanjay Raut - Dada Bhuse
Environmental Degradation : पर्यावरणपूरक योजनांचा बसलाय चाप, तुमसरमध्ये भाजप नेत्याचा होतोय संताप

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com