Rohit Pawar Reply Raj Thackeray : राज ठाकरेंची टीका राष्ट्रवादीच्या जिव्हारी ; रोहित पवारांचा जशास तसा पलटवार; म्हणाले...

Maharashtra Politics : राज ठाकरे गेल्या लोकसभेच्या काळात सामान्य लोकांचे आणि युवांचे प्रश्न खूप प्रखरपणे मांडत होते, पण...
Raj Thackeray-Rohit Pawar
Raj Thackeray-Rohit PawarSarkarnama
Published on
Updated on

Pune : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात पुण्यात झालेल्या गुप्त बैठकीवर निशाणा साधला होता. त्यांनी एक टीम आधी पाठवली आता दुसरीही टीम लवकरच जाईल. शरद पवारांची भूमिका पहिल्यापासून 'प्रो मोदी' अशीच आहे असेही ते म्हणाले होते. पण आता राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी राज ठाकरेंच्या टीकेवर जशास तसा पलटवार केला आहे.

आमदार रोहित पवार(Rohit Pawar) यांनी सोमवारी माध्यमांशी संवाद साधला.यावेळी त्यांनी राज ठाकरेंच्या टीकेचा समाचार घेतला. पवार म्हणाले, मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे गेल्या लोकसभेच्या काळात सामान्य लोकांचे आणि युवांचे प्रश्न खूप प्रखरपणे मांडत होते. मनसेनं आता जी नवीन भूमिका घेतली आहे, ती भूमिका काही प्रमाणात भाजपाच्या जवळ जाणारी आहे असेही ते म्हणाले.

Raj Thackeray-Rohit Pawar
Sanjay Shirsat Criticizes Rohit Pawar : "रोहितजी, तुमच्या पक्षात काय सुरु आहे त्याकडे लक्ष घाला" संजय शिरसाटांचे रोहित पवारांना प्रत्युत्तर

'' ते राज ठाकरे परत कधी दिसणार ?''

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) सध्या भाजपाप्रमाणे बोलतात असे मला वाटते. मी याच्या खोलात जाणार नाही. पण पूर्वीचे राज ठाकरे जे आपल्या सर्वांना माहीत होते. ते राज ठाकरे परत कधी दिसणार? ते सामान्य लोकांचे विषय मांडत होते, यापुढे ते कधी सामान्य लोकांचे प्रश्न मांडतील, याची आम्हाला प्रतीक्षा आहे असा चिमटाही रोहित पवारांनी ठाकरेंना काढला.

राज ठाकरे काय म्हणाले होते ?

शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवारांच्या गुप्त भेटीबाबत राज ठाकरे यांनी भाष्य केले होते. ते म्हणाले,तुम्ही माझं ऐकत नाही. मी सांगितलं होतं ना तेव्हा? हे त्यांचंच स्वत:चंच आहे. त्यांनी एक टीम आधी पाठवली. आता दुसरी जाईल. हे सगळे आतून एकमेकांना मिळालेले आहेत. हे आज नाही, २०१४ पासून मिळाले आहेत. पहाटेचा शपथविधी तुम्हाला आठवत नाही का? शरद पवार आणि अजित पवार यांना भेटायची जागा चोरडिया या नावाच्या व्यक्तीकडे मिळाली हीदेखील कमाल आहे.

Raj Thackeray-Rohit Pawar
Solapur BJP News : सोलापुरात भाजपला धक्का; जिल्हा उपाध्यक्षांसह शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टीका केली आहे. अजित पवार सत्तेत सामील झाले, यामागे शरद पवारच आहेत, असं मी आधीच सांगितलं होतं. शरद पवारांनी एक टीम आधी पाठवली. आता दुसरी जाईल. हे सगळे आतून एकमेकांना मिळालेले आहेत असेही राज ठाकरे म्हणाले.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com