Anil Kadam, Sanjay Raut & Dilip Bankar
Anil Kadam, Sanjay Raut & Dilip BankarSarkarnama

Sanjay Raut : राऊत यांचा गौप्यस्फोट: शरद पवारांना सोडणारा पहिला आमदार...

Sanjay Raut on Dilip Bankar leaving Sharad Pawar: शिवसेना नेते संजय राऊत यांनी शरद पवार यांना सोडणारे निफाडचे आमदार दिलीप बनकर पहिले असल्याचे सांगितले.
Published on

Niphad Assembly constituency: निफाड मतदार संघात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे माजी आमदार अनिल कदम यांची प्रचार सभा झाली. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी यावेळी प्रतिस्पर्धी उमेदवार दिलीप बनकर यांच्याबाबत मोठा खुलासा केला. या खुलासाने निफाड मध्ये बनकर यांना फटका बसू शकतो

निफाड येथे झालेल्या या सभेत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी महायुती बोगस आहे, असे सांगितले. महायुतीचे आमदार दिलीप बनकर यांना मतदान म्हणजे महाराष्ट्र गुजरात पुढे नतमस्तक होण्यासाठीचे मतदान ठरेल. स्वाभिमानी महाराष्ट्रासाठी शिवसेना ठाकरे पक्षाला मतदारांनी साथ द्यावी, असे आवाहन केले.

Anil Kadam, Sanjay Raut & Dilip Bankar
Raj Thackeray : 'मी उद्धव ठाकरेंच्या जागी असतो तर म्हणालो असतो मुख्यमंत्रिपद तुमच्याकडे ठेवा, पण...', राज ठाकरेंनी मनातलं सांगून टाकलं

खासदार राऊत म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी झाली. अनेक आमदार पक्षनेते शरद पवार यांच्या पाठीत खंजीर खुपसून सत्तेसाठी भाजपच्या चरणी लीन झाले. या आमदारांना प्रोत्साहन देण्यासाठी काही लोक काम करत होते. आमदार बनकर हे शरद पवार यांना सोडून जा सांगणारे पहिले आमदार होते. त्यामुळे शरद पवार यांच्याशी झालेल्या गद्दारीच्या बदला घेण्यासाठी आमदार बनकर यांना मोठ्या मतांनी पराभूत करावे लागेल. तरच त्यांना गद्दारीची शिक्षा मिळाली, असे होईल.

Anil Kadam, Sanjay Raut & Dilip Bankar
Balasaheb Thorat : 70 हजार कोटींचा भ्रष्टाचाराचा आरोप, त्याच नेत्याकडे तिजोरीच्या चाव्या; थोरातांचा भाजप अन् अजितदादांवर निशाणा

अनेक गद्दार शरद पवार यांना सोडून जात होते. त्या कालावधीत निफाडचे माजी आमदार अनिल कदम हे शरद पवार यांच्यासोबत राहिले. असा मर्द मावळा गडी हाच निफाडचा आमदार होऊ शकतो. उद्या राज्यात सत्ता आल्यानंतर आम्ही त्यांना निष्ठेचे फळ नक्कीच देऊ. या निष्ठेसाठी त्यांना मोठी जबाबदारी दिली जाईल, असे राऊत म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने देशात दीड हजार कोटी रोजगार निर्माण केले जातील, असे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला पळवून नेले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली असलेले सरकार महाराष्ट्राच्या हिताचे आणि स्वाभिमान जपणारे सरकार होते. ते त्यांनी पाडले.

गेल्या दोन वर्षात राज्यात मिंधे सरकार सत्तेत आहे. त्यांनी महाराष्ट्राची प्रतिष्ठा धुळीला मिळवली. यंदाच्या निवडणुकीत त्यांचा सुपडा साफ होईल, असा अंदाज त्यांना आला आहे. त्यामुळेच गेल्या दोन महिन्यात अनेक घोषणांचा पाऊस त्यांनी पाडला. लाडकी बहीण ही त्यातलीच योजना आहे.

राज्यात महायुतीचे सरकार आले तर या बहिणींची फसवणूक ते करतील. महाविकास आघाडी मात्र या बहिणींना दरमहा 3000 रुपये अनुदान देईल, असे राऊत यांनी सांगितले. यावेळी उमेदवार अनिल कदम, माजी आमदार जिवा पांडू पावीत, माजी आमदार नरेंद्र दराडे, राजाराम पानगव्हाणे, सुभाष कराड, राजेंद्र मोगल, दिगंबर गीते, मुकुंद होळकर आदींनी आपल्या भाषणात महायुती सरकारवर टिका केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com