Raj Thackeray : 'मी उद्धव ठाकरेंच्या जागी असतो तर म्हणालो असतो मुख्यमंत्रिपद तुमच्याकडे ठेवा, पण...', राज ठाकरेंनी मनातलं सांगून टाकलं

Raj Thackeray criticized Uddhav Thackeray : नाशिक महापालिकेत मनसे नावाचा पक्ष पाच वर्ष सत्तेत होता. या कालावधीत येथील पाण्याचा प्रश्न पुढच्या 50 वर्षांसाठी सोडवला. 'सीएसआर' फंडामधून शहराच्या नागरिकांसाठी अनेक सुविधा उभ्या राहिल्या, असे राज ठाकरे म्हणाले.
Raj Thackeray News
Raj Thackeray NewsSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी आज (शनिवारी) नाशिक पश्चिम मतदारसंघात दोन सभा झाल्या. या सभांमध्ये महाराष्ट्राच्या आणि नाशिकच्या समस्यांविषयी मांडणी केली. या समस्या सोडविण्यासाठी मतदारांनी विचार केला पाहिजे. केवळ राजकारण्यांच्या खुर्चीसाठी होणारे राजकारण थांबवले पाहिजे, असे आवाहन करताना उद्धव ठाकरे यांच्या जागी असतो तर काय केले असते हे राज ठाकरेंनी सांगितले.

राज ठाकरे म्हणाले, '2019 साली निकाल लागल्यानंतर जे झालं त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्या जागी मी असतो तर मी म्हटलं असतं, मला मुख्यमंत्रिपद नको ते तुमच्याकडेच ठेवा. मी तुमच्यासोबत येतो पण मी सांगेन त्या गोष्टी माझ्या महाराष्ट्रामध्ये झाल्या पाहिजेत.'

Raj Thackeray News
Rahul Gandhi in Nagpur : राहुल गांधी यांच्या फोडणीची फडणवीसांच्या मतदारसंघात खमंग चर्चा !

राज ठाकरे यांनी नाशिकच्या महिंद्रा उद्योगाबद्दल मोठा गौप्यस्फोट केला. ते म्हणाले, सरकारी अडथळ्यांमुळे 1999 मध्ये महिंद्रा उद्योगपती त्रस्त झाले होते. त्यांना आपल्या उद्योगाचा विस्तार करायचा होता. मात्र त्यांनी सहकार्य मिळत नसल्याने चेन्नईला जाण्याचा निर्णय घेतला होता. हे समजल्यावर मी स्वतः त्यांच्याशी चर्चा केली. त्यांच्या अडचणी समजून घेतल्या आणि सरकारकडून त्या सोडवल्या. त्यामुळे आज हा उद्योग नाशिकमध्ये दिसतो आहे, असा दावा त्यांनी केला.

राज ठाकरे म्हणाले, 2019 मध्ये महाराष्ट्राच्या निवडणुकीत जे घडले, त्यात शिवसेना-भाजप युतीला मतदारांनी कौल दिला होता. प्रत्यक्षात मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदासाठी जे केलंय त्यात महाराष्ट्राचे हित नव्हते. केवळ स्वतःच्या खुर्चीसाठी त्यांनी जो प्रयोग केला. तो योग्य नव्हता.

त्यानंतरच्या अडीच वर्षाच्या काळात हे सरकार पडले. त्यातही पुन्हा सबंध पक्षच ज्यांच्या विरोधात निवडणूक लढवली. त्यांच्याबरोबर जाऊन सत्तेत बसले. हे सर्व करताना त्यांनी मतदारांना विचारले होते का? असा प्रश्न त्यांनी केला. हे सर्व घडले तो मतदारांचा अपमान आहे, असे देखील राज ठाकरे म्हणाले.

खुर्चीमध्ये अजिबातच रस नाही

नाशिक महापालिकेत मनसे नावाचा पक्ष पाच वर्ष सत्तेत होता. या कालावधीत येथील पाण्याचा प्रश्न पुढच्या 50 वर्षांसाठी सोडवला. 'सीएसआर' फंडामधून शहराच्या नागरिकांसाठी अनेक सुविधा उभ्या राहिल्या. अन्य कोणाला हे जमले का हे सर्व मी करतो आहे. ते माझा आवडीचा विषय आहे म्हणून करतो आहे. मला राजकारणात रस नाही. खुर्चीमध्ये अजिबातच रस नाही. माझ्या राज्यासाठी, माझ्या शहरासाठी, काहीतरी करायचे आहे. यात जनतेची स्वप्न पूर्ण करायची, म्हणून मी हे करतो आहे.

'त्या' आमदारांना घरी बसला

ज्यांनी गेल्या पाच वर्षात तुम्हाला फसवलं. त्या आमदारांना तुम्ही घरी बसवा. त्यात अजिबात चूक करू नका. अन्यथा या आमदारांना जर असे वाटले की आम्ही काहीही केले तरी मतदारांना चालते. तर आपल्या भावी पिढीचा घात होईल. तो रोखण्यासाठी मनसेच्या उमेदवारांना मतदान करा. ज्या ज्या मतदार संघात मनसेचा उमेदवार विजयी होईल, त्या प्रत्येक मतदारसंघात मी समक्ष तुम्हाला भेटण्यासाठी येईल. मी येथे आयटी पार्क उभा करून दाखवतो, असे राज ठाकरे यांनी सांगितले.

Raj Thackeray News
Priyanka Gandhi : भाषणाच्या सुरुवातीलाच प्रियांका गांधींनी मागितली महिलांची माफी, म्हणाल्या...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com