Sanjay Raut, Girish Mahajan News
Sanjay Raut, Girish Mahajan NewsSarkarnama

Girish Mahajan News : संजय राऊत यांनी ईशान्य मुंबईतून निवडणूक लढवावीच : महाजनांचे आव्हान

Sanjay Raut & Girish Mahajan News : जळगाव येथे आज जिल्हा नियोजन मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती.

Jalgaon News : माझा साधा शिवसैनिक उभा राहिला तरी निवडणूक जिंकून येईल, असे सांगण्याऱ्या खासदार संजय राऊत यांनी ईशान्य मुंबईतून निवडणूक लढवून जिंकून येवून दाखवावेच, असे थेट आव्हान राज्याचे ग्रामविकास मंत्री व भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी दिले आहे. जळगाव येथे पत्रकारांशी ते बोलत होते.

जळगाव (Jalgaon) येथे आज जिल्हा नियोजन मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकिनंतर महाजन म्हणाले, संजय राऊत हे नेहमी आव्हान देत असतात, साधा शिवसैनिक (Shivsena) उभा राहिला तरी निवडून येईल, आणि पक्षाने मला निवडणू लढण्यास सांगितले तर मी निवडणूक लढवायला तयार आहे. त्यामुळे आपले त्यांना आव्हान आहे, की त्यांनी ईशान्य मुंबईतून लोकसभेची निवडणूक लढवून दाखवावीच.

Sanjay Raut, Girish Mahajan News
Solapur Politics : सोलापूरच्या नेत्यांना झालंय तरी काय? काल काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आज भाजपत हमरीतुमरी

गप्पा करणे, गोष्टी करणे हे सर्व सोप असते. परंतु माझे त्यांना आव्हान आहे, त्यांनी खासदाकीला उभेच रहावे. ते कधीही साधी महापालिकेची निवडणूक लढलेले नाहीत. मात्र, ते मोठ मोठ्या गप्पा मात्र मारत असतात. त्यांनी खासदारकीला उभेच रहावे आणि आपल्याला किती मते पडतात हे एकदा तपासून पहावे, असा टोलाही त्यांनी राऊतांना लगावला.

Sanjay Raut, Girish Mahajan News
BJP MLA Serious Allegation On Khadse : एकनाथ खडसे अधिकाऱ्यांना ‘ब्लॅकमेल’ करतात; भाजप आमदार मंगेश चव्हाणांचा गंभीर आरोप

दरम्यान, निवडणूक लढविण्यासंदर्भात संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले की, पक्षाने आदेश दिला, तर आम्ही काहीही करतो. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर काम केलेले लोक आहोत. पक्षाची गरज, पक्षप्रमुखांचा आदेश मानणाऱ्यांपैकी मी आणि माझे कुटुंब आहे. त्यामुळे पक्षाने आदेश दिल्यास निवडणुकाच काय तर तुरुंगातही जाईन. ईशान्य मुंबई हा लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. या मतदारसंघातून मीच काय तर सामान्य शिवसैनिकसुद्धा दोन ते सव्वा दोन लाख मतांच्या फरकाने निवडून येईल, असा दावाही त्यांनी केला होता.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com