संजय राऊत म्हणाले, तर छगन भुजबळ मंत्री म्हणून दिसले नसते!

शिवसेनेच्या पुढाकारातून महाआघाडीचे सरकार राज्यात आहे. हे सरकार नसते तर भुजबळही मंत्री म्हणून दिसले नसते.
Sanjay Raut & Chhagan Bhujbal
Sanjay Raut & Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

नांदगाव : शिवसेनेच्या पुढाकारातून महाआघाडीचे सरकार राज्यात आहे. हे सरकार नसते तर भुजबळही मंत्री म्हणून दिसले नसते. नाशिकला तुमच्याकडे लाल दिवा आहे व तसा तो कधीतरी आमदार सुहास कांदे(MLA Suhas Kande) यांच्यानिमित्ताने नांदगावलाही येऊ द्यावा, असे प्रतिपादन खासदार संजय राऊत (Shivsena leader Sanjay Raut) यांनी येथे शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात केले.

पालकमंत्री छगन भुजबळ आणि शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्यातील राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा झाला. मात्र त्यात समन्वयाएैवजी भविष्यातही ही राजकीय धग सुरु राहील असा संदेश राऊत यांनी दिला. ते म्हणाले, कुठल्याही परिस्थितीत नांदगाव विधानसभा मतदारसंघातील विविध सत्ता केंद्रांवरील शिवसेनेचा फडकणारा भगवा ध्वज खाली उतरवू देणार नाही. आता भुजबळांनी नांदगावचा नाद सोडून द्यावा.

Sanjay Raut & Chhagan Bhujbal
संजय राऊत म्हणाले, एकदा छगन भुजबळांचाही पाहुणचार करा!

खासदार राऊत म्हणाले, शिवसेना कार्यकर्त्यांनी यापुढे राज्यात शंभर आमदार निवडून आणण्याचा संकल्प करावा. छगन भुजबळ महाआघाडीचे नेते आहेत. त्यांनी आमदार कांदे यांना समजावून घ्यायला हवे. कांदे यांची नांदगाव मतदारसंघातील विकासामागची तळमळ समजवून घेणे गरजेचे आहे. आमदार कांदे चांगला पाहुणचार करतात. त्यांनी एकदा भुजबळांनाही बोलावून घ्यावे. त्यांचा छानसा पाहुणचार करावा. भेदाभेद करू नये. निधीचे सामान वाटप करावे, असा सल्लाही त्यांनी भुजबळांना दिला.

Sanjay Raut & Chhagan Bhujbal
शववाहिकेच्या प्रतिक्षेत आदिवासी माय लेकराच्या मृतदेहाची १२ तास परवड!

ते पुढे म्हणाले, छगन भुजबळ महाआघाडीचे महत्त्वाचे नेते आहेत. आम्ही त्यांचा सन्मान राखतो, असे सुरवातीलाच स्पष्ट करीत खासदार संजय राऊत यांनी आमदार सुहास कांदे यांची नांदगाव मतदारसंघातील विकासासाठी प्रामाणिक तळमळ आहे, हे लक्षात घेऊन भुजबळांनी भाऊसाहेब हिरे यांच्यानंतर विकासाची तळमळ राखणारा हा पहिला आमदार आमच्या शिवसेनेचा असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. शिवसेनेच्या पुण्याईवर तुम्ही राजकारणात टिकून आहात. आज महाविकास आघाडीच्या सरकारात छगन भुजबळ नेते आहेत. त्यांचा सन्मानही आम्ही करू. मात्र, हा सन्मान टिकविण्याची जबाबदारीदेखील तुमची आहे.

आमदार कांदे यांनी विविध विषयांची भूमिका मांडताना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी निधीवाटपात केलेल्या असमान वितरणाचा मुद्दा मेळाव्यात उपस्थित केला. या वेळी संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे, मधुकर हिरे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, सुनील बागूल, विजय करंजकर, माजी आमदार राजाभाऊ देशमुख, नगराध्यक्ष राजेश कवडे, मनमाडचे नगराध्यक्ष गणेश धात्रक, सभापती सुभाष कुटे, तेज कवडे महावीर पारख, गणेश धात्रक, माजी सभापती विलासराव आहेर उपस्थित होते.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com