Sanjay Raut : संजय राऊत यांचा सवाल, मंत्री गिरीश महाजन यांनी केले तरी काय?

Sanjay Raut criticize Girish Mahajan: शिवसेना नेते संजय राऊत यांची विधानसभा निवडणूक प्रचारासाठी महायुतीच्या उमेदवारांसाठी धुळे शहरात सभा झाली.
Girish Mahajan & Sanjay Raut.jpg
Girish Mahajan & Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Assembly election 2024: धुळे शहर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी शिवसेना नेते संजय राऊत यांची सभा झाली. यावेळी राऊत यांनी शहराच्या समस्या आणि नागरिक सहन करीत असलेल्या अडचणींबाबत भाजपला टीकेचे लक्ष्य केले. सत्तेत असूनही भाजपला लोकांसाठी काम करता आले नाही.

धुळे शहर विधानसभा मतदार संघाचे उमेदवार माजी आमदार अनिल गोटे आणि धुळे ग्रामीण मतदार संघाचे काँग्रेसचे उमेदवार आमदार कुणाल पाटील यांच्या प्रचारासाठी धुळे शहरात सभा झाली. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणा देत संजय राऊत यांच्या भाषणाला प्रतिसाद दिला.

Girish Mahajan & Sanjay Raut.jpg
Amit Shah: अमित शहा यांची टीका, "राहुल गांधींना मागासवर्गीयांचे आरक्षण कमी करायचे आहे काय"

धुळे महापालिका, जिल्हा परिषद आदी संस्थांवर भाजप नेत्यांचे वर्चस्व आहे. राज्यातही त्यांचे सरकार आहे. असे असताना धुळे शहरातील दुरावस्था आणि नागरिक प्रश्न अतिशय बिकट आहेत. नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. एवढ्या वर्षात पिण्याच्या पाण्याची सोय देखील होऊ शकलेली नाही.

Girish Mahajan & Sanjay Raut.jpg
Girish Mahajan : दिनकर पाटील यांचा आरोप, "गिरीश महाजन यांनी मला पाच वेळा फसवले"

धुळे शहरातील नागरिकांना सतत पाण्याची प्रतीक्षा करावी लागते. या शहरात कचऱ्यांचे ढिग दिसतात. मग राज्यात आणि शहरात सत्ता असताना भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी काय केले? या जिल्ह्याची जबाबदारी मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे आहे. मंत्री महाजन यांनी धुळे शहर वासियांसाठी केले तरी काय? असा प्रश्न पडतो. ज्यांना नागरिकांचे प्रश्न सोडवता येत नाही. शहराचा विकास करता येत नाही. हे सिद्ध झालेल्या भाजपला यंदा विधानसभा निवडणुकीत सत्तेपासून दूर ठेवा, असे आवाहन खासदार राऊत यांनी केले.

विधानसभा निवडणुक राज्याच्या विकासासाठी आणि राज्याच्या प्रश्नांसाठी असते. मात्र भारतीय जनता पक्षाचे नेते या निवडणुकीतही जनतेचा बुद्धिभेद करण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात, बटेंगे तो कटेंगे. मात्र ही भावना फक्त भाजपमध्येच आहे.

महाराष्ट्रातील सर्व जनता भाजपला चांगली ओळखून आहे. सर्व समाज अतिशय गुण्यागोविंदाने एकत्र नांदत आहेत. त्यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री झालेले पाहायचे आहे. त्यामुळे भाजपच्या अशा खोट्या प्रचाराला महाराष्ट्रातील जनता बळी पडणार नाही, असे खासदार राऊत म्हणाले.

भाजपसोबत सत्तेचा उपभोग घेण्यासाठी गेलेले आमचे विरोधक म्हणतात, उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाचा विचार सोडला, म्हणूनच आम्ही महायुती बरोबर गेलो. मात्र त्या शपथविधीला उद्योगपती अदानी हेदेखील उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगपती गौतम अदानी यांना मुंबई गिळायची आहे. जोपर्यंत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतील तोपर्यंत ते शक्य होणार नाही. याची जाणीव असल्यानेच एका मोठ्या कारस्थानाचा भाग म्हणून उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडण्यात आले.

महाराष्ट्रातील जनतेने अतिशय सावधपणे या निवडणुकीत मतदान करावे. भाजपला सत्तेपासून बाजूला ठेवावे. यातच खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे हित आहे, असेही खासदार राऊत यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com