Sanjay Raut
Sanjay RautSarkarnama

Sanjay Raut Politics: संजय राऊत यांचे चंद्रकांत पाटील यांना सडेतोड उत्तर, तुम्ही शिवसेना उद्धव ठाकरेंची...

Sanjay Raut vs Chandrakant Patil: संजय राऊत यांनी पुन्हा एकदा ईव्हीएम वर खापर फोडले.
Published on

Shiv Sena Internal Conflict: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा नुकताच महाराष्ट्राचा दौरा झाला. दौऱ्यानंतर अनेक राजकीय विषयांवरून दोन्ही शिवसेना एकमेकांसमोर ठाकल्या आहेत. दोन्ही पक्षांत आरोप प्रत्यारोप सुरू आहेत.

आमदार चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षावर टीका केली होती. उद्धव ठाकरे यांना सत्तेत सहभागी व्हायचे आहे. मात्र भाजप त्यांना जवळ करण्यास तयार नाही, असे ते म्हणाले होते. त्याला शिवसेना नेते संजय राऊत यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

Sanjay Raut
Sanjay Raut Politics: शिवसेनेच्या नाशिक मेळाव्यात चक्क बाळासाहेब ठाकरे करणार भाषण... ‘या’ तंत्रामुळे होणार शक्य!

खासदार संजय राऊत म्हणाले, आम्हाला अजिबात सत्तेत जायचे नाही. यासंदर्भात आमची भूमिका अगदी स्पष्ट आहे. तुम्ही ‘ईव्हीएम’च्या माध्यमातून जिंकून आला आहात. कोणीही त्यांना मतदान केलेले नाही. किमान चंद्रकांत पाटील यांना तर मतदारसंघातील अजिबात कोणीच मतदान केलेले नाही.

Sanjay Raut
Malegaon Politics : प्रसाद हिरेंचा काँग्रेसला मोठा धक्का! आज भाजपमध्ये प्रवेश करणार

आमदार चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षावर कॉमेंट्स न केलेल्या बऱ्या. त्यांनी आपल्या पक्षाची काळजी करावी. कारण आमच्याकडे सक्षम उमेदवार आहेत. तुमच्याकडे मात्र फक्त ‘ईव्हीएम’ आणि पैसे आहेत, असा चिमटा राऊत यांनी घेतला.

लाडकी बहीण योजनेमुळे राज्य सरकार अडचणीत आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या संदर्भात कितीही बोलत असले तरी राज्य आर्थिक संकटात आहे. हेच वास्तव आहे. मुख्यमंत्र्यांना या संदर्भात उघडपणे बोलण्यात मर्यादा आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याची जाणीव आहे. ते बोलत नसले तरी, त्यांना आर्थिक चिंतेने ग्रासले आहे.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महात्मा फुले चित्रपटाविषयी केलेल्या विधानावरही राऊत यांनी टीका केली. महसूल मंत्री बावनकुळे यांच्या डोक्यात या चित्रपटाविषयी एवढी तिडीक का? आहे. हे समजत नाही. त्यामुळेच आम्ही सामनाच्या अग्रलेखातून या संदर्भात थेट मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com