Sanjay Raut Politics: शिवसेनेच्या नाशिक मेळाव्यात चक्क बाळासाहेब ठाकरे करणार भाषण... ‘या’ तंत्रामुळे होणार शक्य!

Sanjay Raut; Uddhav Thackeray's first rally outside Mumbai will be in Nashik tomorrow-शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचा नाशिकला उद्या मुंबई बाहेर पहिले कार्यकर्त्यांचे शिबिर
Uddhav-Thackeray, Balasaheb Thackeray & Sanjay Raut
Uddhav-Thackeray, Balasaheb Thackeray & Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

Sanjay Raut News: कोल्हापूरचा मुहूर्त हुकला, मात्र उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत नाशिकची कार्यशाळा निश्चित आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुंबई बाहेर होणारा हा पहिला कार्यकर्त्यांचा मेळावा आहे. या मेळाव्याची पक्षाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे.

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांना नवीन जोष भरण्यासाठी पक्ष प्रयत्नशील आहे. त्यासाठी उद्या (ता. १६) नाशिकला दिवसभर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची कार्यशाळा होईल. या कार्यशाळेत अनेक नवीन प्रयोग होणार आहे. त्यामुळे या कार्यशाळेबाबत पक्षाबरोबरच सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे.

Uddhav-Thackeray, Balasaheb Thackeray & Sanjay Raut
Uddhav Thackeray News: नाशिकमधून उद्धव ठाकरेंच्या 'फायरब्रँड' नेत्यानं थेट PM मोदींच्या हिंदुत्वालाच ललकारलं; म्हणाले...

शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष पहिल्यांदाच आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) तंत्राचा वापर या मेळाव्यात करणार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या मेळाव्यात भाषण होईल. हे भाषण अतिशय वेगळे आणि आक्रमक शैलीतील असेल. आजवर कोणीही ऐकले नसेल, असे हे भाषण असेल. हा प्रयोग पहिल्यांदाच करण्यात येत असल्याचे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी सांगितले.

Uddhav-Thackeray, Balasaheb Thackeray & Sanjay Raut
Gulabrao Patil : सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेलं पोट्टं, त्याला जिल्हा परिषद शाळा काय कळते.. गुलाबराव पाटलांची रोहित पवारांवर टीका

नाशिकचे हे पहिले शिबिर असून त्याच धर्तीवर राज्यभर शिबिरे घेतली जाणार आहेत. आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत या शिबिराचे उद्घाटन होईल तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सायंकाळी समारोप होईल. ठाकरे परिवाराचे नाशिक वर विशेष प्रेम आहे त्यामुळेच मुंबई बाहेरचे पहिले शिबिर नाशिकला होत आहे.

गेल्या काही कालावधीत घडलेल्या विविध घटनांचा राज्याच्या आणि देशाच्या राजकारणावर मोठा परिणाम झाला आहे यामध्ये पक्षात झालेल्या बंडखोरीनंतर न्यायालयीन निकाल लांबले. अनुषंगाने कायदेशीर विषयावर ॲड असीम सरोदे शिबिरात मार्गदर्शन करतील.

--------

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com