
Ahilyanagar political riots news : अहिल्यानगरसह राज्यात सुरू असलेल्या दंगलीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मोठा भाष्य केलं आहे.
'राज्यातील अतिवृष्टीवरून, पूरपरिस्थितीवरून लक्ष विचलित करण्यासाठी हे उद्योग सुरू आहे. तसंच अहिल्यानगरमधील महापालिकेतील साडेचारशे कोटींच्या रस्त्यांच्या कामातील भ्रष्टाचारावरून लक्ष दुसरीकडे नेण्यासाठी तिथं दंगल घडवली गेली,' असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. शिवसेना ठाकरे सेना पक्षाचे अहिल्यानगरमधील शहरप्रमुख किरण काळे यांनी खासदार राऊतांचा व्हिडिओ शेअर करत, ही माहिती दिली.
खासदार संजय राऊत यांनी, "अहिल्यानगर मधल्या महापालिकेतला साडेचारशे कोटींचा रस्त्यांच्या कामांचा भ्रष्टाचार शिवसेना (Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाने बाहेर काढला. ते प्रकरण आता न्यायालयात गेलं आहे. हे प्रकरण काढलं म्हणून आमचा शहरप्रमुख किरण काळेंना अटक केली गेली." अहिल्यानगरमध्येही प्रचंड अतिवृष्टी झाली. या सगळ्या वरच लक्ष विचलित करण्यासाठी काहींना दंगली घडवायच्या आहेत. हे जे काही बाडगे हिंदुत्ववादी आहेत, जे आज टिळा लावून फिरत आहेत, ते अशा प्रकारच्या दंगली अहिल्यानगरमध्ये घडवत आहेत, असा घणाघात राऊतांनी केला आहे.
अहिल्यानगर महापालिकेतील बाहेर काढलेला रस्ते घोटाळा, राज्यात वाढवत चालेली धार्मिक तेढ, तणावपूर्ण परिस्थिती, अतिवृष्टी याबाबत प्रसार माध्यमांशी खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी संवाद साधला आहे. ते म्हणाले, "अनेक गोष्टी चर्चेतून सुटू शकतात. पण प्रशासनाला आदेश आहेत की तणाव निर्माण होईल, अशा प्रकारचे निर्णय घ्या. प्रश्न सोडवू नका. पोलिसांनी अशा प्रकारचं वर्तन करणं हे कायदा, सुव्यवस्थेसाठी योग्य नाही."
'मराठवाड्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली. त्यानंतर सरकारचा बोजवारा उडाला आहे. तो झाकण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या उप कंपन्या या दंगली घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्रातलं वातावरण आता दंगलींपेक्षा पूर परिस्थिती, अतिवृष्टी यावर चर्चा करण्याची गरज असताना त्याच्यावरचे लक्ष विचलित करण्यासाठी, सरकार शेतकऱ्यांना मदत करण्यात कसं अपयशी आहे यावरून लक्ष हटवण्यासाठी हे सुरू आहे,' असा गंभीर आरोप खासदार राऊतांनी केला आहे.
'हा देश हिंदूंचा आहे. या देशामध्ये हिंदुत्ववाद राहणार. प्रभावीपणे राहणार. हे आम्ही सांगतो आहोत. या हिंदुत्ववाद्यांनी जरी दंगली घडवल्या. मात्र त्यांनी भारत-पाकिस्तान सामन्याला विरोध नाही केला. त्या सामन्याचं मानधन पाकिस्तानी खेळाडूंनी तिथल्या एका प्रमुख दहशतवाद्याच्या संघटनेला दिलं आहे. मसूद अझहरला दिलं आहे. या गोष्टींना विरोध करण्याची यांच्याच हिम्मत नाही. हे जे काही आता महाराष्ट्रात अहिल्यानगरसह इतरत्र दंगली घडवत आहेत, हे बोगस आणि भंपक हिंदुत्ववादी आहेत. ढोंगी लोकं आहेत,' असा घणाघात देखील संजय राऊतांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.