संजय राऊत सर्वप्रथम करणार नाशिकचा दौरा!

नाशिकच्या शिवसेना नेत्यांनी खासदार संजय राऊत यांचे जोरदार स्वागत केले.
Nashik Leaders with Sanjay Raut
Nashik Leaders with Sanjay RautSarkarnama

नाशिक : `ईडी`च्या (ED) कारवाईनंतर काल न्यायालयाने जामीनावर (Court grant bail) मुक्त केलेल्या शिवसेना नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची आज नाशिकच्या (Nashik) शिवसेना (Shivsena) पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. यावेळी श्री. राऊत यांनी लवकरच नाशिकचा दौरा करणार आहे. पक्षाची संघटनात्मक घडी अधिक प्रभावी करण्यात येईल, असे सांगितले. (Nashik Shivsena office bearers meet MP Sanjay Raut in Mumbai)

Nashik Leaders with Sanjay Raut
आमदार सुहास कांदेंच्या मतदारसंघात संजय राऊत सुटकेनंतर फटाके फोडून आनंदोत्सव

खासदार राऊत यांच्या मुंबई येथील निवासस्थानी आज सकाळपासूनच विविध भागातून कार्यकर्ते, नेत्यांची भेटीसाठी आज मोठी गर्दी होती. यातील बुहतांशी नागरिकांशी त्यांनी चर्चा केली. त्यांच्या सुचना ऐकल्या.

Nashik Leaders with Sanjay Raut
आदेशाला स्थगिती आली, त्यानंतर राष्ट्रवादी जागी झाली!

यावेळी नाशिकच्या पदाधिकाऱ्यांना खासदार राऊत म्हणाले, शिवसेनेच्या विरोधकांनी कितीही प्रयत्न केले, मार्गात अडथळे आणले तरी शिवसेना आपल्या मार्गाने खंबीरपणे चालत राहील. हाच आजवरचा इतिहास आहे. त्यात काहीही बदल होणार नाही. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखावी लवकरच पक्षाला आधीपेक्षाही अधिक चांगले दिवस येतील, याबाबत मला काहीही शंका नाही.

यावेळी माजी आमदार गिते, माजी महापौर विनायक पांडे यांनी त्यांना शुभेच्छा देऊन, नाशिकची शिवसेना भक्कम आहे. सर्व नेते, पदाधिकारी जागरूकपणे काम करीत आहेत. बंडखोर गट तसेच फुटीचे कारस्थान करणारी मंडळी आजही दिवसरात्र लहान लहान कार्यकर्त्यांची दिशाभून करून त्यांना ओढण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र त्यात ते यशस्वी होणार नाही. नाशिकमध्ये शिवसेना भक्कम राहिल्याने विरोधकांचीच झोप उडाली आहे, असे सांगितले.

यावेळी खासदार राऊत म्हणाले, यापुढे अधिक जागरूक व आक्रमकपणे सर्वांनी एकोप्याने काम करावे लागेल. मी लवकरच पक्षाच्या संघटनात्मक वाढीसाठी दौरा करणार आहे. सर्वात आधी नाशिकला येण्याचा माझा प्रयत्न असेल. या दौऱ्यात महापालिकेसह आगामी सर्व निवडणुकांना सामोरे जाण्याचे नियोजन करू.

शिवसेनेविरोधात झालेल्या राजकीय षडयंत्रातून उद्धव ठाकरे यांना पायउतार व्हावे लागले. सध्या तर जे सत्तेत आहे, ती मंडळी सतत शिवसेनेच्या विरोधात कारस्थाने करीत आहे. हे लोकांना पसंत पडलेले नाही. त्यामुळे लोकभावना शिवसेनेबरोबर आहे.

मुंबई येथील राऊत यांच्या निवासस्थानी शिवसेनेचे उपनेते सुनिल बागूल, माजी आमदार वसंत गिते, माजी महापौर विनायक पांडे, दत्ता गायकवाड आणि राजेंद्र देसाई यांनी खासदार संजय राऊत यांचे गुलाबाच्या फुलांचा मोठा हार देऊन त्यांचे स्वागत केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com