आदेशाला स्थगिती आली, त्यानंतर राष्ट्रवादी जागी झाली!

सिडको प्रशासक कांचन बोधले यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले.
NCP delegation at Cidco Office
NCP delegation at Cidco OfficeSarkarnama

सिडको : भाजपच्या (BJP) आमदार सीमा हिरे (Seema Hirey) यांनी सिडको कार्यालय बंद करावे (Cidco office closed down) यासाठी प्रयत्न केले. तसा आदेश मिळवला. त्याच्या तीव्र प्रतिक्रीया उमटल्या. शिंदे गटाने (Eknath Shinde Group) त्याला स्थगिती मिळवली. (Chief Minister Eknath Shinde given stay order to closed down Cidco nashik Office)

NCP delegation at Cidco Office
`त्या` अभियंत्यांच्या प्रतापाने संयमी नरहरी झिरवाळ संतापले!

सिडकोत यावर जोरदार राजकारण घडत असताना राष्ट्रवादी काँग्रेस निद्रीस्त होती. आदेश आले. त्यावर स्थगितीही आली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस जागी झाल्याने तो चर्चेचा विषय आहे.

NCP delegation at Cidco Office
आमदार हिरामण खोसकरांनी शिकवला तीन अभियंत्यांना चांगलाच धडा!

तीन लाख सिडकोवासीयांसाठी हा गंभीर प्रश्न असल्याने माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी देखील दोन दिवसांपूर्वीच त्याला विरोध केला होता. त्यांनी शासनाला पत्र देखील दिले होते, हे विशेष!

सिडकोचे कार्यालय सुरू ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष नाना महाले यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यानी प्रशासक अधिकारी कांचन बोधले यांना निवेदन दिले. सिडको परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर कामगार, कष्टकरी वर्ग राहत असून सिडकोतील नागरिक हे बिकट परिस्थितीत उदरनिर्वाह करीत आहे.

दोन वर्षापूर्वीच कोरोना सारख्या मोठ्या संकटाला सामोरे जात असताना अनेक कामगारांच्या हाताचा रोजगार गेला होता. परत सिडको स्थलांतराचे मोठे संकट सिडकोवासीयांवर ओढवले आहे. सिडको कार्यालय बंद झाले तर नागरिकांची मोठी गैरसोय होणार आहे. सिडकोचे इतर प्रकल्पाचे नियोजन प्राधिकरणाचे अधिकार त्या- त्या ठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्थांकडे वर्ग करण्यात आलेली असून तेथे सुद्धा नाशिक येथे वर नमूद केलेली नागरिकांची कामे अद्यापदेखील सुरू असून त्या ठिकाणचे सिडकोचे कार्यालय सुरू आहे. त्यामुळे नाशिक येथील सिडकोचे कार्यालय बंद करण्याचा अन्यायकारक निर्णय त्वरित मागे घेऊन नाशिक येथील सिडकोचे कार्यालय पूर्ववत सुरु ठेवण्यात यावे अशी मागणी केली आहे.

या वेळी सिडको विभाग अध्यक्ष मकरंद सोमवंशी, नाशिक पश्चिम विधानसभा अध्यक्ष बाळा गिते, संतोष कमोद, रवींद्र शिंदे, अमोल नाईक, मुकेश शेवाळे, अजय पाटील, किरण शिंदे, किरण बडदे, अमर वझरे, हरीश महाजन, विकी डहाळे, पुष्पा राठोड आदी उपस्थित होते.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com