Sanjay Raut Politics: संजय राऊत यांचा त्रागा... निकटवर्तीय सुधाकर बडगुजर यांच्यावर बोलणे टाळले!

Sanjay Raut;Sanjay Raut avoided talking about Sudhakar Badgujar -शिवसेना उपनेते सुधाकर बडगुजर म्हणजे नाशिकची संपूर्ण शिवसेना नव्हे, असा दावा राऊत यांनी केला आहे.
Sudhakar-Badgujar-Sanjay-Raut
Sudhakar-Badgujar-Sanjay-RautSarkarnama
Published on
Updated on

Sanjay Raut News: शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे उपनेते आणि नाशिकचे माजी नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी आपण नाराज असल्याचे म्हटले होते. त्यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट देखील घेतली आहे. त्यामुळे नाशिकमध्ये मोठी राजकीय उलथापालथ सुरू असल्याचे बोलले जाते.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी नाशिक मधील नाराज दहा ते बारा पदाधिकारी आणि पक्षांतराच्या चर्चेवर आज बोलणे टाळले. याबाबत संबंधितांचा कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे त्याविषयी प्रतिक्रिया देणे योग्य होणार नाही असे राऊत म्हणाले.

आज सकाळी शिवसेना नेते संजय राऊत यांची पत्रकारांशी झालेल्या चर्चेत त्यांनी विविध विषयांवर मतप्रदर्शन केले. यावेळी नाशिकच्या शिवसेनेला अनेक पदाधिकारी सोडून जाण्याच्या तयारीत आहे. विशेषता उपनेते बडगुजर हे पक्ष सोडण्याच्या मार्गावर असल्याने पुढे काय? असा प्रश्न आहे. सुधाकर बडगुजर यांनी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. सुधाकर बडगुजर म्हणजे नाशिकची संपूर्ण शिवसेना नव्हे असे ते म्हणाले.

Sudhakar-Badgujar-Sanjay-Raut
Raju Shetti: राजू शेट्टी यांचा सवाल; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ वर्ष जगभर फिरून साध्य काय केले?

नाशिक शहरातील शिवसेनेला मोठा धक्का देण्याची तयारी भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष करीत आहे. त्यासाठी स्वतः जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी पडद्यामागून सूत्रे हलविली आहेत. मात्र स्थानिक भाजपच्या नेत्यांची यासंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. बडगुजर यांच्या बाबत भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांत मोठी नाराजी आहे.

Sudhakar-Badgujar-Sanjay-Raut
Prasad Tanpure Letter to Ajit Pawar : '...तर कृषी संशोधनाच्या अस्तित्त्वाला धोका'; माजी खासदार तनपुरेंचं अजितदांदाना पत्र

शिवसेना एकनाथ शिंदे यांनी स्वतः शिवसेनेचे महानगर प्रमुख विलास शिंदे यांच्या कन्येच्या विवाहाला विशेष उपस्थिती दर्शविली होती. त्यांनी विलास शिंदे हे आमचे जुने कार्यकर्ते आहेत असे सूचक विधान देखील केले आहे. त्यामुळे विलास शिंदे भाजपच्या की शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या वाटेवर आहेत हे गुलदस्त्यात आहे.

एकंदरच नाशिक शहरातील शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला मोठा हादरा देण्याची तयारी सत्ताधारी महायुतीने सुरू केली आहे. आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. हे दोन्ही पक्ष अद्यापही विरोधी पक्षांना पूर्णतः नामोहरम करण्यासाठी आणि फोडाफोडीच्या राजकारणात व्यस्त असल्याने सामान्य नागरिकांत देखील तो चर्चेचा विषय आहे.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com