Raju Shetti Questions PM Modi: सध्या केंद्र शासनाकडून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्यात आले आहे. शेतमालाची बाजारपेठ ठप्प करण्यात आली आहे. त्यामुळे कधी नव्हे एवढा देशातील शेतकरी अडचणीत आला आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी याबाबत केंद्र शासनाला टार्गेट केले आहे. पंतप्रधान मोदी देशाचा कारभार करताना अपयशी ठरत आहेत. परराष्ट्र धोरण असो वा शेती धोरण दोन्ही ठिकाणी त्यांना यश मिळालेले नाही, असा दावा राजू शेट्टी यांनी केला.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात नुकतेच तणावाचे वातावरण होते. दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर राबविले. या लष्करी कारवाईनंतर भारताला जगभरातून अपेक्षित पाठिंबा मिळाला नाही. याची खंत वाटते. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरले, असे म्हणावे लागेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी गेली अकरा वर्ष जगभरात फिरत होते. अनेक देशांना त्यांनी भेटी दिल्या. त्याचा मोठा गवगवा झाला. मात्र जेव्हा देशाला ऑपरेशन सिंदूर राबविल्यानंतर जगभरातून पाठिंबा अपेक्षित होता, तेव्हा असे काहीही घडले नाही. जगभरात भारताचे परराष्ट्र धोरण स्थिर नाही अशी प्रतिमा निर्माण झाली आहे. ती तातडीने सुधारावी लागेल, असे शेट्टी म्हणाले.
केंद्रातील पंतप्रधान मोदी यांचे सरकार उद्योगपतींना सवलती देत आहे. मोठी कर्जे माफ करीत आहे. त्याचा देशाला काहीही लाभ झालेला दिसत नाही. उद्योगपती यांच्यापेक्षा शेतकरी देशाला अधिक समृद्ध आणि पुढे नेण्याचे काम करू शकतो. सरकारचे धोरण शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचं आहे.
सध्या चीन आणि अमेरिका यांच्यात व्यापार युद्ध सुरू आहे. त्यातून भारताला मोठी संधी आहे. चीन अमेरिका वादाचा फायदा भारताने घेतला पाहिजे. सरकारने उद्योगपतींचा नाद सोडला पाहिजे. शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिल्यास ते परिश्रम घेऊन देशाला पुढे नेतील असा विश्वास शेट्टी यांनी व्यक्त केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.