Water Politics: सत्ताधाऱ्यांतच जुंपली, मंत्री संजय शिरसाठ यांनी दिला भाजपला 'हा' इशारा...

Sanjay shirsat; BJP welcomes water decision, Shinde's Minister Sanjay shirsat warns-मराठवाड्याच्या समन्यायी पाणी वाटपाच्या सुधारणेचे भाजप आमदाराने स्वागत केले होते.
Devyani Pharande & Sanjay Shirsat
Devyani Pharande & Sanjay ShirsatSarkarnama
Published on
Updated on

BJP Vs Shivsena News: मराठवाड्यातील पाण्यासाठी जायकवाडी धरणाचा उपयोग होतो. या धरणातील ६५ टक्के पाणीसाठा हा निकष बदलण्याची शिफारस करण्यात आली आहे. यावरून आता सत्ताधारी पक्षांतच जुंपली आहे.

उच्च न्यायालयाच्या नव्या निर्णयानुसार समन्यायी पाणी वाटपाच्या प्रमाणात घट करण्यात आली आहे. नव्या शिफारशीनुसार जायकवाडी धरणात ६५ टक्के ऐवजी ५८ टक्के साठा निश्चित करण्यात आला आहे. यावर जनतेच्या शिफारशी घेण्यात येणार आहेत.

Devyani Pharande & Sanjay Shirsat
Sharad Pawar : राष्ट्रवादीची झाडाझडती; जयंत पाटलांवर फुटणार पराभवाचे खापर?

मेंढीगिरी समितीच्या शिफारशीनुसार जायकवाडी धरणात ६५ टक्के पेक्षा कमी साठा असल्यास नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील धरणातून विशेषत: गोदावरी खोऱ्यातून पाणी सोडण्यात येते. यावरून नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचा मोठा विरोध होता. यावरून आंदोलन देखील झाले होते.

Devyani Pharande & Sanjay Shirsat
Guardian Minister : राष्ट्रवादी-शिवसेनेत पालकमंत्रिपदाबाबत समझोता! रायगडसाठी नाशिकवरील दावा सोडणार?

आता हे प्रमाण ५८ टक्के करण्यात आले आहे. त्यामुळे अहिल्यावगर आणि नाशिकला तो दिलास मानला जातो. त्याचे भारतीय जनता पक्षाचे आमदार देवयानी फरांदे यांनी नुकतेच स्वागत केले होते. त्यावर नागरिक आणि शेतकऱ्यांनी आपल्या सकारात्मक प्रतिक्रिया नोंदवाव्या असे आवाहन त्यांनी केले होते त्यामुळे नाशिककरांना हा दिलासा मानला जात होता.

मात्र यासंदर्भात समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या धोरणाला आपला विरोध असून या प्रश्नासाठी मोठे आंदोलन उभे करण्याची ही त्यांची तयारी असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे या प्रश्नावरून सत्ताधारी भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या नेते व मंत्र्यांतच जुंपण्याची चिन्हे आहेत.

हा अहवालच मुळात मराठवाड्यावर अन्याय करणार आहे. तो इतरांच्या फायद्यासाठी आहे. त्यामुळे तो आम्ही स्वीकारणार नाही, असा इशाराच मंत्री शिरसाट यांनी दिला आहे. त्यामुळे या प्रश्नावरून आता सत्ताधारी पक्षातील शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे.

या संदर्भात मंत्री शिरसाट यांनी जलसंपदा मंत्री अहिल्यानगरचे असल्यामुळे मराठवाड्याच्या लोकांना धास्ती वाटते, असे सुचक विधान केले आहे. या संदर्भात मंत्री कोणीही असले तरी न्यायीक भूमिका घ्यावी लागणार आहे. त्यामुळे न्यायालयाचे निर्देश त्यांनाही पाळावे लागतील. मराठवाड्याला पाणी द्यावेच लागेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

त्यामुळे आगामी काळात भारतीय जनता पक्षाचे नेते, मंत्री आणि आमदार तसेच शिवसेना शिंदे गटाचे समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट या विषयावर आक्रमक भूमिका घेण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे या भागातील सत्ताधारी पक्षातील नेत्यांना राजकारणासाठी एक नवा विषय मिळाला हे मात्र नक्की.

-------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com