Sharad Pawar : राष्ट्रवादीची झाडाझडती; जयंत पाटलांवर फुटणार पराभवाचे खापर?

NCP Party Meeting : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पराभूत उमेदवार आणि जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांची बैठक येत्या नऊ जानेवारीला होत आहे. शरद पवार विधानसभा निवडणुकीतील पराभूत उमेदवार आणि प्रमुख जिल्हा नेत्यांची चर्चा करणार आहेत.
Sharad Pawar
Sharad Pawar Sarkarnama
Published on
Updated on

NCP SP News : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा फटका बसला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला पराभवाच्या धक्का बसला. या धक्क्यातून सावरण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पराभूत उमेदवार आणि जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांची बैठक येत्या नऊ जानेवारीला होत आहे.

शरद पवार यांनी ही बैठक बोलावली असून या बैठकीत विधानसभा निवडणुकीचा आढावा घेतला जाईल. त्यामुळे या बैठकीत काय होते याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी निश्चित केले होते. या संदर्भात निवड समितीकडे प्रस्ताव गेल्यानंतर सदस्यांनी सुचविलेल्या अनेक उमेदवारांच्या नावावर प्रदेशाध्यक्षांनी फुली मारल्याची तक्रार आहे.

त्यामुळे विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाबाबत पक्षाच्या प्रमुख नेत्यांमध्ये आणि जिल्हास्तरीय नेत्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. या नाराजीचे पडसाद 9 जानेवारीला होणाऱ्या बैठकीत उमटण्याची चिन्हे आहेत. यामध्ये बहुतांशी नेत्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांना जबाबदार धरण्यासाठी मोर्चेबांधणी केल्याचे बोलले जाते. त्यामुळे या बैठकीत पराभूत उमेदवार आणि उमेदवारीची संधी नाकारलेल्यांच्या भावनांचा स्फोट होण्याची चिन्हे आहेत.

Sharad Pawar
Delhi BJP Candidate List : भाजपने जाहीर केली 29 उमेदवारांची पहिली यादी; केजरीवालांच्या विरोधात 'हा' उमेदवार मैदानात

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (NCP) पक्षावर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचा मोठा दबाव होता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अनेक जागा शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने घेतल्याचे बोलले जाते. यासंदर्भात खासदार संजय राऊत यांनी वापरलेल्या राजकीय दबाव तंत्राला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील बळी पडल्याचे बोलले जाते. उमेदवारी देताना सामाजिक समतोल बिघडल्याचा आरोप नाशिकच्या काही नेत्यांनी केला आहे. नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा आमदार होते. मात्र प्रत्यक्षात या पक्षाने अवघ्या पाच जागांवर उमेदवार दिले होते.

Sharad Pawar
Shirsat V/S Sattar News : सत्तार यांनी माझ्यासह बोरणारे, संजना जाधव यांच्याविरोधात काम केले!

विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सामाजिक समतोल साधला नाही. उमेदवारी देताना दोन उमेदवार अन्य पक्षातून ऐनवेळी आयात केलेले होते. देवळाली मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने चांगली बांधणी केली असताना, ही जागा ऐनवेळी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला सोडण्यात आली. त्यामुळे येथे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचा उमेदवार देखील पराभूत झाला. जिल्ह्यातील सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्ते या प्रश्नावर आक्रमक असल्याने मुंबईत होणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर पराभवाचे खापर फोडले जाण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com