Santosh Deshmukh murder case: धक्कादायक, संतोष देशमुख हत्येतील फरार कृष्णा आंधळे नाशिकमध्ये?

Santosh Deshmukh murder; Is Krishna Andhale, the fugitive in the Deshmukh murder case, blind in Nashik?-संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरारी कृष्णा आंधळे नाशिक मध्ये दिसल्याचा दावा.
Absconded krishna Andhale
Absconded krishna AndhaleSarkarnama
Published on
Updated on

Santosh Deshmukh murder Case- मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एक आरोपी अद्यापही फरारी आहे. त्याचा राज्यभर शोध घेऊनही त्याने पोलिसांच्या हातावर तुरी दिल्या आहेत. आता या प्रकरणाला वेगळेच वळण मिळण्याची शक्यता आहे.

आज सकाळी नाशिक शहरातील गंगापूर रस्त्यावरील सहदेव नगर भागात दत्त मंदिरालगत संशयित कृष्णा आंधळे दिसला होता. यावेळी येथे उपस्थित असलेल्या काही नागरिकांनी तसा दावा केला. त्यांनी तातडीने गंगापूर रोड पोलिसांना याबाबत माहिती दिली आहे.

Absconded krishna Andhale
Nashik Politics : भाजपच्या दांडगाईने पर्यावरणवाद्यांना आठवला आदित्य ठाकरेंचा तो दौरा...

या माहितीने पोलीस सतर्क झाले त्यांनी तातडीने कृष्णा आंधळे याचा शोध सुरू केला आहे. त्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. नागरिकांकडून देखील माहिती घेतली जात आहे.

Absconded krishna Andhale
MIM Politics: ‘एमआयएम’च्या माजी नगरसेवकाची महापालिका कर्मचाऱ्यांशी धुमश्चक्री!

या संदर्भात पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील यांनी संबंधित माहिती संवेदनशील असल्याने पोलीस कसोशीने त्याची खातरजमा करीत आहे. संशयित कृष्णा आंधळे याचा शोध घेण्यासाठी नागरिकांची मदत घेतली जात आहे. पोलीस या संदर्भात विविध भागात तपास करीत आहेत. हा विषय गंभीर असल्याने पोलीस याबाबत कोणतीही सर्व शक्यता पडताळून पाहत असल्याचे त्यांनी सांगितले.

सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील कृष्ण आंधळे याला विविध ठिकाणी शोध घेऊनही विशेष तपास पथकाला त्याचा मागणीस लागला नव्हता. त्यामुळे राज्यभर पोलिसांची नाचक्की होत आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कृष्णा आंधळे यांची हत्या झाली असावी, असा संशय व्यक्त केला होता. बीडच्या अन्य राजकीय नेत्यांना देखील असाच संशय आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी संबंध जोडला जात होता. त्यामुळे धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला आहे. यातील मुख्य आरोपी पोलिसांच्या कोठडीत आहेत. मंत्री मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराड या प्रकरणातील मुख्य आका असल्याचा दावा केला जातो.

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींचा संबंध यापूर्वी देखील नाशिकशी जोडला गेला होता. यातील एक आरोपी विष्णू चाटे याने आपला मोबाईल नाशिकमध्ये फेकून दिल्याचा संशय होता. विष्णू चाटे याने नाशिकमध्ये मोबाईल नष्ट केला, अशीही शक्यता आहे. अशा स्थितीत कृष्णा आंधळे नाशिकमध्ये आढळल्यास पोलीस गांभीर्याने त्याकडे पहात आहे.

------

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com