Pathardi Bazar Samiti Results
Pathardi Bazar Samiti ResultsSarkarnama

Pathardi Bazar Samiti Results: मोनिका राजळेंचा प्रताप ढाकणेंना मोठा धक्का; 18 पैकी 17 जागांवर दणदणीत विजय

Pathardi Bazar Samiti News : प्रताप ढाकणे यांना मोठा धक्का
Published on

Ahmednagar News : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी (दि.28 एप्रिल) मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर आज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे निकाल समोर येत आहेत.

अहमदनगरधील पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतमोजणीला सकाळपासूनच सुरवात झाली. पाथर्डी बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपने राष्ट्रवादीला दणका दिला आहे.

भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांच्या गटाने पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समितीत तब्बल 17 जागा जिंकल्या आहेत. तर राष्ट्रवादीचे नेते प्रताप ढाकणे यांच्या गटाला अवघी एक जागा मिळाली आहे. त्यामुळे प्रताप ढाकणे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.

Pathardi Bazar Samiti Results
Karjat Bazar Samiti Results: राम शिंदे-रोहित पवारांमध्ये मोठी चुरस: दोन्ही गटाला समान जागा; फेर मतमोजणी सुरू

याआधी पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समितीत ढाकणेंच्या गटाची सत्ता होती. मात्र, यावेळी आमदार मोनिका राजळे यांनी मतदारसंघातील बाजार समिती त्यांच्या हातातून हिसकावली आहे.

आमदार मोनिका राजळे यांच्या आदिनाथ शेतकरी मंडळाने 18 पैकी 17 जागा जिंकत ढाकणे यांच्या जगंदबा मंडळाला धोबीपछाड दिली. त्यामुळे पाथर्डी बाजार समितीत प्रताप ढाकणे यांच्या गटाला जोरदार धक्का बसला आहे.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com