Satyajeet Tambe Politics: नाशिक पुणे रेल्वे साठी सर्वपक्षीय नेते पुकारणार एल्गार, प्रश्न फडणवीसांच्या दरबारी!

Political pressure for pune nashik train: आमदार सत्यजित तांबे यांच्या पुढाकाराने नाशिक आणि पुण्याचे लोकप्रतिनिधी आक्रमक झाले.
Satyajeet Tambe & Manikrao Kokate
Satyajeet Tambe & Manikrao KokateSarkarnama
Published on
Updated on

Satyajeet Tambe News: नाशिक पुणे हाय स्पीड रेल्वे प्रकल्पावर कार्यवाही सुरू आहे. रेल्वेच्या या मार्गात अचानक राजकीय अडथळा आला आहे. हा मार्ग सत्ताधारी पक्षाकडूनच बदलाच्या हालचाली आहेत. त्या विरोधात आता सर्वपक्षीय नेते एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

नाशिक पुणे हाय स्पीड रेल्वे बदलण्याचा राजकीय हालचाली नवा वादाचा विषय ठरणार आहे. हा मार्ग काही नेत्यांना शिर्डी आणि नगर मार्गे नेण्याचा हट्ट धरल्याचे बोलले जाते. असे झाल्यास या प्रकल्पाच्या मूळ हेतूलाच हरताळ फासला जाणार आहे. त्यामुळे मूळ प्रकल्पानुसारच हा मार्ग करण्यात यावा यासाठी वातावरण तापू लागले आहे.

Satyajeet Tambe & Manikrao Kokate
Devendra Fadnavis Politics: धनंजय मुंडेंचा राजीनामा; देवेंद्र फडणवीसांच्या मास्टर स्ट्रोक, अजित पवारांची केली कोंडी!

आमदार सत्यजित तांबे यांनी यासंदर्भात गेले काही दिवस पाठपुरावा सुरू केला आहे. त्याला आता अन्य नेत्यांचाही प्रतिसाद मिळू लागला आहे. त्यामुळे नाशिक पुणे रेल्वे मार्ग नावाप्रमाणेच स्पीडने सुरू करण्यात यावा, अशी जोरदार मागणी होत आहे.

Satyajeet Tambe & Manikrao Kokate
Vanchit Bahujan Aaghadi : भाजपच्या आमदाराचा निरोप धुडकवला; वंचितचा 'झुकेगा नहीं'चा इशारा

या संदर्भात कृषीमंत्री माणिकराव कोकाटे, आमदार सत्यजित तांबे, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार अमोल खताळ यांची बैठक झाली. या बैठकीत खासदार राजाभाऊ वाजे, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, खासदार अमोल कोल्हे, आमदार बाबाजी काळे आणि आमदार शरद सोनवणे या लोकप्रतिनिधींनी ऑनलाईन भाग घेतला.

नाशिक पुणे सेमी हाय स्पीड रेल्वे मार्ग मूळ नियोजनानुसारच अस्तित्वात आला पाहिजे. यासाठी या लोकप्रतिनिधींनी एकमताने आग्रह धरला. या संदर्भात वेळ पडल्यास संघर्ष करण्याची तयारीही त्यांनी दाखवली. येत्या दोन-तीन दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची यासंदर्भात भेट घेतली जाणार आहे.

हा प्रकल्प सरळ मार्गे न नेता काही बदल केल्यास हे अंतर ७० ते ८० किलोमीटर वाढणार आहे. त्यातून प्रवासाचा कालावधी जवळपास दीड तासांनी वाढेल. ‘जीएमआरटी’ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून रेल्वे मार्गासाठी बोगदा आणि अन्य अडचणी याबाबत पर्याय उपलब्ध आहे. त्यामुळे शास्त्रोक्त विचार करून नाशिक पुणे रेल्वे मार्ग मूळ प्रकल्प नुसारच करण्यात यावा. त्यात अन्य शहरांचा समावेश करू नये, अशी मागणी करण्यात आली.

या निमित्ताने गेले काही दिवस या रेल्वे मार्गाच्या प्रकल्पात बदल करण्याचे संकेत देण्यात येत होते. रेल्वेमंत्री अश्विनी कुमार यांनी देखील आपल्या नाशिक दौऱ्यात त्याबाबत माहिती दिली होती. त्यामुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

नाशिक पुणे हा अत्यंत व्यस्त मार्ग असल्याने रेल्वेचा पर्याय आवश्यक आहे. मात्र त्यात पडद्यामागून सुरू झालेल्या राजकीय हालचालींचा अडथळा निर्माण झाला आहे. त्या विरोधात नाशिक आणि पुण्याचे लोकप्रतिनिधी एल्गार पुकारण्याच्या मनस्थितीत आहेत.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com