Satyajeet Tambe Latest News : सत्यजित तांबे अडवणार विखेंच्या शिर्डी रेल्वेचा मार्ग

Nashik Pune semi-high-speed railway Issue Politics - नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे शिर्डी मार्गे नेण्यास आमदार सत्यजित तांबे यांनी केला कडाडून विरोध. रस्त्यावर उतरून विरोध करू असा इशारा त्यांनी दिला.
Satyajeet Tambe
Satyajeet Tambe Sarkarnama
Published on
Updated on

Nasik-Pune Railway News: नाशिक-पुणे सेमी हाय स्पीड रेल्वेच्या मूळ आराखड्यात बदल करण्याचा घाट घालण्यात आला आहे. ही रेल्वे शिर्डी मार्गे नेण्याचा सत्ताधारी पक्षांचा प्रयत्न आहे. त्याला आमदार सत्यजित तांबे यांनी कडाडून विरोध केला आहे. असे झाल्यास रस्त्यावर उतरून विरोध करू असा इशारा त्यांनी दिला. Politics Of Nashik

नाशिक- पुणे Nashik- Pune सेमी हाय स्पीड रेल्वे प्रकल्प गेल्या चार वर्षापासून केवळ सर्वेक्षणाच्या नकाशावरच अडकून पडला आहे. आता या नकाशात देखील बदल करण्याचा घाट घालण्यात आला आहे. नाशिक पुणे रेल्वे आता शिर्डी Shirdi मार्गे नेण्याचा प्रयत्न आहे. त्याला आमदार तांबे यांनी विरोध केला आहे. शिर्डी हा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे Radhakrishna Vikhe Patil पाटील यांच्या मतदारसंघात आहे. नाशिकहून पुण्याला जाताना शिर्डीला रेल्वे नेल्यास त्याच्या मूळ आराखडा आणि उद्देश दोन्हींना बाधा येईल, असा दावा तांबे यांचा आहे. मात्र यानिमित्ताने पुन्हा एकदा नगर मधील थोरात आणि विखे यांच्या राजकारणाचा एक अँगल पुढे आला आहे.Latest Nashik News

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Satyajeet Tambe
Chhagan Bhujbal News : 200 कोटींचे बेकायदेशीर भूसंपादन?, भुजबळांची मुख्यमंत्र्यांकडे धाव!

मुंबई पुणे हायस्पीड रेल्वेचे सर्वेक्षण 2017-18 या आर्थिक वर्षात करण्यात आला होता. यामध्ये नाशिक, सिन्नर, संगमनेर, नारायणगाव, राजगुरुनगर मार्गे पुणे असा प्रस्तावित मार्ग होता. या मार्गावर रेल्वे धावल्यास या भागातील औद्योगिक तसेच नागरी विकासाला चालना मिळेल यासंदर्भात केंद्र आणि राज्य शासनाचा सहभाग आणि पुढाकार होता. महारेल कंपनी आणि मध्य रेल्वे यांच्या संयुक्त प्रयत्नातून ही रेल्वे होणार आहे. सर्वेक्षणातील मार्गानुसार सह्याद्रीच्या डोंगरातून बोगदे करावे लागणार असल्याने त्याचा खर्च वाढतो. त्यामुळे शिर्डी मार्गे नेल्यास ही रेल्वे कमी खर्चात होईल असा मध्य रेल्वेचा दावा आहे. आता मध्य रेल्वेच्या या दाव्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. आगामी काळात त्यातून राजकारण तापण्याची चिन्हे आहेत.Nasik-Pune Railway News

आमदार सत्यजित तांबे Satyajeet Tambe यांनी नाशिक पुणे सेमी हाय स्पीड रेल्वेचा प्रश्न उचलून धरला आहे. या संदर्भात त्यांनी विधिमंडळात आवाज देखील उठविला होता. राज्य शासनाने याबाबत तातडीने पावले उचलावीत या संदर्भात भौगोलिक दृष्ट्या ही रेल्वे नाशिक आणि पुणे परिसरातील नागरी विकासाला चालना देणारी ठरेल, असा त्यांचा दावा आहे. याबाबत आता तांबे अधिक आक्रमक झाले आहेत. शासनाने रेल्वे मार्गात बदल केल्यास अथवा तातडीने पावले न उचलल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. यानिमित्ताने आमदार तांबे यांनी आपल्या मतदारसंघाची नेमकी राजकीय नस पकडली आहे. त्याचा राजकीय लाभ त्यांना होईल यात संशय नाही.

नाशिक -पुणे मार्गात संगमनेर Sangamner हा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात Balasaheb Thorat यांचा मतदारसंघ आहे. शिर्डी हा राज्याचे महसूल मंत्री आणि भाजप नेते डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील Radhakrishna Vikhe Patil यांचा मतदारसंघ आहे. नगर मधील या दोन्ही नेत्यांमध्ये तीव्र राजकीय स्पर्धा आहे. त्याचे राजकीय पडसाद या निमित्ताने उमटताना दिसतात त्यामुळे आगामी काळात विखे विरुद्ध थोरात हे राजकारण नाशिक पुणे रेल्वेच्या मार्गात देखील अडथळे निर्माण करते की रेल्वेला गती देते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

Edited By : Rashmi Mane

Satyajeet Tambe
Dindori Lok Sabha Constituency : दिंडोरीसाठी शरद पवार गटातून गावित अन् भगरेंमध्ये रस्सीखेच; सर्व्हेअंती होणार निवड!

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com