Satyajeet Tambe : बाळासाहेब का पडले? सत्यजीत तांबे म्हणाले, 'पैशाचा अमाप वापर...'

Satyajeet Tambe Reacts to Balasaheb Thorat Defeat in Sangamner Nashik MLC on Congress Setback : विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब थोरात यांचा संगमनेरमधील पराभवामागील कारणांवर आमदार सत्यजीत तांबे यांनी प्रतिक्रिया दिली.
Satyajeet Tambe Patil 1
Satyajeet Tambe Patil 1Sarkarnama
Published on
Updated on

Sangamner election result : विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब थोरात यांना पराभवाचा धक्का बसला. विधानसभा निवडणूक होऊन सहा महिने झाले. तरी थोरात यांच्या पराभवाची चर्चा थांबत नाही.

लोकसभेला अहिल्यानगर दक्षिण मतदारसंघात नीलेश लंकेंच्या विजयात थोरात यांची भूमिका किंगमेकरची भूमिका ठरली. भाजपचे सुजय विखे यांचा इथं पराभव झाला. याच पराभवाचा वचपा घेण्यासाठी विखे पिता-पुत्रांनी संगमनेरमध्ये लक्ष घातलं आणि हेच थोरात यांच्या पराभवाचं मूळ कारण असल्याचे सांगितलं जातं. बाळासाहेब थोरात यांच्या पराभवावर बोलताना त्यांचे भाचे आमदार सत्यजीत तांबे यांनी प्रतिक्रिया दिली.

बाळासाहेब (Balasaheb Thorat) का पडले यावर बोलताना आमदार तांबे म्हणाले, "आम्हाला आत्मविश्वास थोडा जास्त झाला, अतिआत्मविश्वास नडला. ओवर कॉन्फिडंटमध्ये होतो की, आमचा पराभव होऊच शकत नाही. याशिवाय अनेक राजकीय कारणं आहे".

"लोकसभानंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी (Election) संगमनेर शहरात चुकीच्या मार्गाचे प्रोपगंडा सुरू झाले, तसे ते राबवले गेले. हिंदू-मुस्लिमांमध्ये भांडण लावली गेली. आम्ही मुस्लिम धार्णिज्य आहोत. थोरातसाहेब मुस्लिम धार्णिज्य आहेत, अशाप्रकारची प्रतिमा तयार करण्यात आली. लाडकी बहीण योजनाचा परिणाम झाला. पैशाचा अमाप वापर झाला. या सर्वांचा परिणाम झाला", असेही आमदार तांबे यांनी सांगितले.

Satyajeet Tambe Patil 1
Satyajeet Tambe BJP : भाजपमध्ये कधी जाणार? सत्यजीत तांबे यांचं मोठं विधान

थोरातांनी लंकेंना मदत केली. यामुळे विखेंनी जोर लावला. हे पराभवांचं प्रमुख कारण आहे का? यावर आमदार तांबे म्हणाले, "थोरातसाहेबांनी लंकेंना मदत केली ती काही पर्सनल म्हणून नाही केली. ते महाविकास आघाडीचे उमेदवार होते, म्हणून केली". सुजय विखे यांच्या पराभवामध्ये राज्यातील महाविकास आघाडीचं वातावरण होतं, अँटी बीजेपी वातावरण होते, त्याला मी जास्त जबाबदार पकडतो, असेही आमदार तांबे यांनी म्हटले.

Satyajeet Tambe Patil 1
Chhagan Bhujbal Nashik : कोण होणार नाशिकचा पालकमंत्री? मंत्री छगन भुजबळ म्हणाले...

नेत्याला खात्री पटली की...

आपला प्रतिस्पर्धी पडू शकतो, हे जेव्हा नेत्याला कळतं, तेव्हा नेता अधिक जोर लावतो. हे सर्व मोठ्या नेत्यांचं वैशिष्ट असतं. जोपर्यंत नैया पार होत आहे, याची खात्री पडत नाही, तोपर्यंत नैयामध्ये नेता बसत नाही. खात्री पटली की, सुजय विखेंचा पराभव होऊ शकतो, तिथं त्यांनी प्रयत्न केला. सुजय विखे यांच्या पराभवामध्ये राज्यातील महाविकास आघाडीचं वातावरण होतं, अँटी बीजेपी वातावरण होते, त्याला मी जास्त जबाबदार पकडतो. तसंच विखेंनी इथं लक्ष घातलं, त्यांना अंदाज यायला लागला. जमतंय, जमतंय, जमतंय, जमत असेल तर करा, ही भावना नेत्यांमध्ये असते. आणि ते त्यातून झालं, असेही आमदार तांबे यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com