Satyajeet Tambe News; तांबेचा डाव हा तर प्री प्लॅन मिशन लोटस!

तांबे परिवाराने मतदारांच्या भावनांशी खेळ केला, त्यांना जागा दाखवू
Purshottam Kadlag & Satyajeet Tambe
Purshottam Kadlag & Satyajeet TambeSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : (Nashik) सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी काल महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. याद्वारे त्यांनी मतदार व महाविकास आघाडीच्या घटक पक्षांची फसवणूक केली आहे. हा तर प्री प्लॅन मिशन लोटसचा (BJP) भाग आहे, त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ, असा इशारा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे (NCP) प्रदेश कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलग (Purshottam Kadlag) यांनी दिला आहे. (NCP Warns Tambe family for unethical politics in Graduate Constituency election)

Purshottam Kadlag & Satyajeet Tambe
Congress news; डॉ. सुधीर तांबे यांनी तीन महिने काय केले?

काँग्रेस पक्षाने विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांना नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवारी दिली होती. त्यासाठी त्यांना एबी फॉर्म देखील देण्यात आला. मात्र त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. त्याऐवजी सत्यजीत तांबे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

Purshottam Kadlag & Satyajeet Tambe
Shirdi Bus Accident News: साखर झोपेतच दहा भाविक ठार; मुख्यमंत्र्यांकडून साह्य!

याबाबत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष कडलग यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे. त्यांनी याबाबत वरिष्ठ नेते लवकरच धोरणात्मक निर्णय घेतील. महाविकास आघाडीला धोका देण्याचा प्रकार घडला आहे.

ते म्हणाले, तांबे कुटुंबीयांना त्यांची जागा दाखवुन देवू. नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाची जागा ही महाविकास आघाडी मार्फत कॉंग्रेस पक्षाला सोडलेली होती. मात्र आमदार सुधीर तांबे यांची माघार व सत्यजीत तांबे यांची अपक्ष उमेदवारी हा प्री प्लँन मिशन लोटस असल्याची चर्चा होत आहे. जिल्हा तसेच उत्तर महाराष्ट्रातून देखिल फोनवर कार्यकर्ते नाराज असल्याची माहिती कळवत आहेत. त्यामुळे आम्हाला या तांबे यांच्या भूमिकेने धक्का बसला आहे.

कॉंग्रेस पक्षाला अंधारात ठेवुन तांबे कुटुंबीयांनी पक्षाचा व महाविकास आघाडीने टाकलेल्या विश्वासाचा गैरवापर करत भाजपशी हातमिळवणि केल्याचे न समजण्याईतकी जनता दुधखुळी नाही.

उत्तर महाराष्ट्रात भाजप विरोधी वातावरण आहे. नाशिक विभागातील मतदार अशा गद्दारांना भिक घालणार नाही. यापुर्वी ही जागा बंडखोरीनेच कॉंग्रेस कडे गेलेली होती. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या आदेशानंतर पक्षाचा कार्यकर्ता ह्या प्रकाराला १६ तारखेनंतर चोख उत्तर देईल.

असे आहे प्रकरण...

अर्ज दाखल करण्याची गुरुवारी (ता. 12) अखेरची मुदत होती. यात शेवटच्या क्षणी मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला. काँग्रेसकडून डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर झालेली असताना शेवटच्या क्षणी सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. सुधीर तांबे यांच्याकडे काँग्रेसचा एबी फॉर्म असूनही त्यांनी पक्षातर्फे अर्ज भरला नाही. दरम्यान, अपक्ष अर्ज भरला असला तरी मी महाविकास आघाडीचा उमेदवार आहे. वेळेवर काँग्रेसकडून एबी फॉर्म न मिळाल्याने अपक्ष म्हणून अर्ज भरावा लागल्याची माहिती सत्यजित तांबे यांनी दिली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com