Gulabrao Patil News : गुलाबराव पाटील म्हणतात, सी व्होटरचे सर्व्हे अंदाज चुकीचे, घरी बसून बनवलेले

लोकसभा निवडणुकीला दीड आणि विधानसभा निवडणुकीला अजून पावणे दोन वर्षे इतका काळ बाकी आहे
Gulabrao Patil
Gulabrao PatilSarkarnama
Published on
Updated on

Gulabrao Patil News : आयुष्यात मी सर्व सर्व्हे पाहिले आहेत,त्यात जे दाखवले जाते नेमके त्याच्या उलट घडते, त्या मुळे सी व्होटर ने लोकसभेचे दाखवलेले अंदाज चुकीचे आहेत,ते घरी बसून बनविलेले आहेत.असा आरोप राज्याचे पाणी पुरवठा मंत्री,व शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी केला आहे.

पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीला दीड आणि विधानसभा निवडणुकीला अजून पावणे दोन वर्षे इतका काळ बाकी आहे, आयुष्यात मी पण सर्व्हे पाहिले आहेत, जे सर्व्हेत दाखवलं जातं त्याच्या विरुद्ध दिसलेले आहेत, त्यामुळे माझा सर्व्हेवर विश्वास नाही,जनतेच्या मताची पेटीमध्ये जाण्याची जी हवा असते ती इलेक्शनच्या काही दिवस आधी बनते.

Gulabrao Patil
Mla Santosh Danve News : सकाळी मफलर, दुपारी ब्लेझर, संध्याकाळी फाॅर्मल; दानवेंच्या लूकची चर्चा..

मला आठवत ज्यावेळेस मी निवडणूक हरलो होतो तेव्हा सर्व्हेत मला विजयी दाखवलं होतं तर ज्यावेळेस मी जिंकलो होतो तेव्हा सर्व्हेने प्रतिस्पर्धीला 85 हजार मतं दाखवली होती, त्यामुळे मला सर्व्हेवर विश्वास नाहीएक अफवा माणसाला जिंकवू आणि हरवू शकतेसी वोटरने आजचे अंदाज सांगितले आहेत, त्यांचे अगोदरचे अंदाज जर पाहिले तर ते फेकू अंदाज आहेतएकही अंदाज त्यांचा ठिकाणावर नाही. मला असं वाटतं त्यांनी घरी बसून हा अंदाज केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com