SC Reservation Sub Classification : आरक्षणातील उपवर्गीकरणावरून नवा वाद! मंत्री संजय शिरसाटांचा मोठा दावा; ‘या विषयाला जाणीवपूर्वक ट्विस्ट दिला जातोय’

Debate over SC reservation sub-classification intensifies Maharashtra as Minister Sanjay Shirsat reacts while Ambedkarite groups launch Beed Mumbai protest march : अहिल्यानगर येथील आंबेडकरी समाजाने उपवर्गीकरण रद्द करण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली असून, बीड ते मुंबई लाँग मार्च आज सायंकाळी अहिल्यानगरमध्ये दाखल होत आहे.
SC Reservation Sub Classification
SC Reservation Sub ClassificationSarkarnama
Published on
Updated on

Reservation Policy Maharashtra : अनुसूचित जाती (SC) आरक्षणातील उपवर्गीकरणाचा मुद्दा राज्यात पुन्हा एकदा तापू लागला असून, हे उपवर्गीकरण पूर्णपणे रद्द करण्याची मागणी आता जोर धरत आहे.

या पार्श्वभूमीवर राज्याचे समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांनी मोठा दावा करत, “उपवर्गीकरणाच्या विषयाला काहीजण जाणीवपूर्वक ट्विस्ट देण्याचा प्रयत्न करत आहेत,” असे विधान केले आहे. दरम्यान, अहिल्यानगर येथील आंबेडकरी समाजाने उपवर्गीकरण रद्द करण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली असून, बीड ते मुंबई लाँग मार्च आज सायंकाळी अहिल्यानगरमध्ये दाखल होत आहे.

बीड ते मुंबई (Mumbai) निघालेल्या लाँग मार्चबाबत प्रतिक्रिया देताना मंत्री संजय शिरसाट म्हणाले की, लोकशाहीत प्रत्येकाला आपली मागणी मांडण्याचा आणि आंदोलन करण्याचा अधिकार आहे. मात्र या आंदोलनाच्या माध्यमातून उपवर्गीकरणाच्या मुद्द्याला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं दिसत आहे.

मंत्री शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी स्पष्ट केलं की, बिदर समितीचा अहवाल अद्याप सरकारने मंजूर केलेला नाही. या संदर्भात आतापर्यंत तब्बल एक लाखांहून अधिक हरकती दाखल झाल्या आहेत. हरकती दाखल करण्यासाठी मुदतवाढही देण्यात आली असून, सर्व हरकतींवर सुनावणी झाल्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल. त्यानंतरच हा विषय राज्य मंत्रिमंडळासमोर येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

SC Reservation Sub Classification
Shiv Sena UBT Crisis : ठाकरेंना मोठा धक्का? ‘ऑपरेशन टायगर’ची गरजच नाही, लोक स्वतःहून येतायत; मंत्री संजय शिरसाटांचा मोठा दावा

या संवेदनशील विषयावर बोलताना मंत्री शिरसाट यांनी स्पष्ट आश्वासन दिलं की, या प्रक्रियेत समाविष्ट असलेल्या 59 जाती-जमातींपैकी कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही. कोणाचं आरक्षण काढून दुसऱ्याला देण्याचा प्रश्नच नाही. तसेच, जातनिहाय जनगणना पूर्ण होईपर्यंत उपवर्गीकरणाच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

SC Reservation Sub Classification
Rahul Gandhi Big Political Move Fails : ‘काँग्रेसचा पराभव काँग्रेसच करते’ पुन्हा खरं ठरलं? दिग्विजय-रेवंथ-मोहन यादव कनेक्शन? मीनाक्षी नटराजन प्रकरणाने राहुल गांधींना धक्का

दरम्यान, अहिल्यानगरमधील आंबेडकरी समाजाने अनुसूचित जातीतील उपवर्गीकरण रद्द करण्याची जोरदार मागणी केली आहे. लाँग मार्च स्वागत समितीचे अध्यक्ष तथा नगरसेवक सुरेश बनसोडे आणि आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते अशोक गायकवाड यांनी यासंदर्भात निवेदन सादर केले. अशोक गायकवाड यांनी सांगितले की, लाँग मार्चच्या प्रमुखांसोबत चर्चा करून अहिल्यानगरमधील आंबेडकरी चळवळीच्या पुढील आंदोलनाची दिशा निश्चित केली जाईल.

‘सरकारच्या भूमिकेवर समाधानी, पण गाफिल राहणार नाही’

मंत्री संजय शिरसाट यांनी आंबेडकरी कार्यकर्त्यांसमोर मांडलेल्या भूमिकेबाबत समाधान व्यक्त करताना आंदोलनकर्त्यांनी सरकारला इशाराही दिला. “सध्या सरकारची भूमिका ऐकून समाधान वाटत असलं तरी आम्ही गाफिल राहणार नाही,” असा स्पष्ट इशारा आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com