Eknath Shinde Politics: हाऊसफुल्ल भाजपची दारे बंद; एकनाथ शिंदेंना लागेल का घबाड योग?

Seat sharing tension in Mahayuti, BJP preparing for self-reliance, waiting for Eknath Shinde party-आता जळगाव महापालिकेसाठी भाजपची पडद्याआडून स्वबळाची तयारी पूर्ण?
Girish Mahajan & Eknath shinde
Girish Mahajan & Eknath shindeSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon Politics: आधीच इच्छुकांची गर्दी, त्यात अनेकांना प्रवेशाची प्रतीक्षा. दुसरीकडे विद्यमान नगरसेवकांची ताठर भूमिका त्यामुळे भाजप नेत्यांची कोंडी झाली आहे. जळगाव महापालिकेच्या निवडणुकीसाठी जोरदार ओढाताण सुरू आहे.

मावळत्या जळगाव महापालिकेत तत्कालीन मंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठ्या प्रमाणावर पक्षांतर घडवले. जळगाव महापालिकेत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाची सत्ता आली. त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला होता.

सध्या मात्र परिस्थिती नेमकी उलटी झाली आहे. भाजप सत्तेत आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष विरोधात असे चित्र आहे. त्यामुळे ठाकरे पक्षात गेलेल्या अनेकांना स्वगृही परतण्याचे वेध लागले आहेत.

Girish Mahajan & Eknath shinde
Devyani Farande : कोणी नुकसान केलं? आमदार फरांदेंवर प्रमोद महाजन गार्डन तिसऱ्या दिवशीच बंद ठेवण्याची वेळ

भाजपने सत्तेच्या माध्यमातून जळगाव शहरासह जिल्ह्यात पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत केली. या स्थितीत भाजपकडे ५५ ते ५७ प्रबळ उमेदवार आहेत. या जागांवर पाणी सोडण्यास अथवा त्या अन्य पक्षांना देण्याचा त्याग करण्याची भाजपची तयारी नाही.

Girish Mahajan & Eknath shinde
Kumbhmela Politics: त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील कारवाईने सरकारला घरचा आहेर, ‘जिल्ह्यात चार मंत्री, एकालाही शेतकऱ्यांची दया आली नाही’

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातील अनेकांना भाजप पक्षात प्रवेश करायचा होता. मात्र शहराध्यक्ष आमदार सुरेश भोळे आणि पदाधिकाऱ्यांनी त्याला प्रखर विरोध केला. त्यामुळे या माजी नगरसेवकांचा प्रवेश लांबला. आता हा प्रवेश होण्याची शक्यता धूसर झाली आहे.

सध्याच्या स्थितीत भाजप ५५ ते ५७ जागा स्वतःकडे ठेवू इच्छिते. १७ ते १८ जागा शिवसेना शिंदे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला देण्यास तयार आहे. हा प्रस्ताव दोन्ही पक्षांना अमान्य आहे. दुसरीकडे भाजपची पडद्यामागे स्वबळाची तयारी पूर्ण झाल्याचे बोलले जाते.

या स्थितीत शिवसेना शिंदे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार दोन्ही पक्ष वेट अँड वॉच भूमिकेत आहेत. भाजपने ताटकळत ठेवल्याने शिवसेना ठाकरे पक्षाचे माजी नगरसेवक शिंदे पक्षात प्रवेश करण्यास उत्सुक आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदेंना जळगाव महापालिकेत घबाड योग दिसू लागला आहे.

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि राज्यातील सत्ता यामुळे जळगाव जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा या सर्व सत्ता केंद्रांवर भाजप प्रस्थापित आहे. त्यामुळे महायुती होऊ नये हीच भाजपच्या इच्छुकांची अपेक्षा आहे. त्यामुळेच नेत्यांनीही त्या दिशेने पावले टाकली आहे.

अशा स्थितीत हाउसफुल्ल भाजपने इतरांच्या प्रवेशासाठी दरवाजे बंद केले आहेत. त्यामुळे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी या संधीचा लाभ उठविण्याची तयारी केली आहे. महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाला त्यामुळे घबाड योग दिसू लागला आहे.

-------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com