Seema Hiray : भाजप आमदार सीमा हिरे यांना समर्थकांनी केले 'भावी मंत्री'

BJP MLA Seema Here is looking for a ministerial post? : मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त अनिश्चित असला तरीही भाजपच्या अनेकांना मंत्रिपदाचे वेध लागले आहेत. नाशिक शहरातील भाजप आमदार सीमा हिरे यांचे 'भावी मंत्री' म्हणून त्यांच्या समर्थकांनी फ्लेक्स झळकवले आहेत.
Seema Hiray
Seema HiraySarkarnama
Published on
Updated on

Seema Hiray News : भारतीय जनता पक्षाच्या शहरातील आमदार सीमा हिरे यांचा आज वाढदिवस आहे. या निमित्ताने शहरभर समर्थकांनी फ्लेक्स झळकवले आहेत. या फ्लेक्सची वेगळ्याच कारणाने चर्चा होत आहे.

आमदार सीमा हिरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी लावलेल्या काही फ्लेक्स वर त्यांचा 'भावी मंत्री', असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे हे फ्लेक्स आणि आमदार हिरे यांचा वाढदिवस चर्चेचा विषय ठरला आहे. मंत्रिपदासाठी सुरू असलेले लाॅबिंग देखील चर्चेत आहे.

राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार किंवा होणार याबाबत सातत्याने वावड्या उठविल्या जात आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराला नेमका मुहूर्त केव्हा लागणार हे निश्चित नाही. मात्र नाशिक (Nashik) शहरातील आमदार सीमा हिरे यांचा देखील मंत्रिमंडळ विस्तारात समावेश होईल असे प्रयत्न आहेत. आमदार हिरे यांचा आज वाढदिवस आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तो धुमधडाक्यात साजरा होत आहे. अनेक समर्थकांनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी शहरभर फ्लेक्स झळकवले आहेत.

Seema Hiray
Ram Shinde And Manisha Kayande : राम शिंदेंची 'रत्नदीप'वर लक्षवेधी; मनीषा कायंदे म्हणाल्या, 'प्रकरण मिटवायचा...'

भारतीय जनता पक्षाचे (BJP) शहरातील तीन व जिल्ह्यात दोन, असे पाच आमदार आहेत. यामध्ये डॉ. राहुल आहेर, आमदार सीमा हिरे आणि आमदार देवयानी फरांदे हे तिघेही विस्तारात समावेश व्हावा म्हणून प्रयत्नशील आहेत. त्यासाठी समर्थक आणि पदाधिकाऱ्यांकडून वरिष्ठांकडे जोरदार लॉबिंग देखील सुरू आहे. हे लाॅबिंग किती फळाला येते याकडे लक्ष लागले आहे.

Seema Hiray
Action on Vasant Gite Office : वसंत गीतेंचे कार्यालय पाडण्यासाठी मोठा फौजफाटा दाखल; मुंबईनाका परिसरात तणाव!

त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार होईल की नाही, यापेक्षाही झालाच तर मंत्री कोण? हा नाशिकच्या राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय आहे. आमदार हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त लागलेल्या फ्लेक्समुळे तो पुन्हा चर्चेत आला. लोकसभा निवडणुकीमुळे नाशिकची बरीच राजकीय गणितं बदलली आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी नाशिकमधील राजकीय गणित भाजप कोणत्या दिशेने नेणार अशी चर्चा रंगली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com