

Shahada Politics News: मतदारांना आकर्षित करण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील शहादा नगरपालिका निवडणुकीत एका अपक्ष उमेदवारानं मोठी अनोखी शक्कल लढवली आहे. प्रभाग क्र. 10 मधील अपक्ष उमेदवार तुषार अशोक कुवर यांनी आपल्याच मतदान करा, असे सांगण्यासाठी एक अनोखा प्रयोग केला आहे. याची चर्चा सध्या नंदुरबार जिल्ह्यात होत आहे.
तुषार कुवर यांनी आपला निवडणूक वचननामा थेट 100 च्या नॉन-ज्युडिशियल स्टॅम्प पेपरवर लिहून एक प्रकारे नागरिकांना कायदेशीर गॅरंटी दिली आहे. या वचननाम्यात त्यांनी 10-15 वर्षांसाठी टिकणारे रस्ते, दररोज स्वच्छता, नियमित पाणीपुरवठा आणि सीसीटीव्ही सुरक्षा यासह 10 प्रमुख कामांची हमी दिली आहे.
निवडून आल्यानंतर दोन वर्षांच्या आत ही कामे पूर्ण न झाल्यास आपण आपल्या पदाचा राजीनामा देऊ, असेही त्यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे. त्यांच्या या हटके कृतीची शहादा शहरात सध्या वचननाम्याची चर्चा रंगली आहे. हा प्रयोग मतदारांना प्रभावित करतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
व्हिजन शहादा साठी आम्ही काम करीत आहे. कुणाच्या भरोशावर काम न करता स्वतंत्र म्हणून आम्ही निवडणूक लढवत आहोत. अपक्ष उमेदवारांवर कुणाचा दबाब नसतो, त्यामुळे चांगले कामे होतात. सर्वसामान्याच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी मी निवडणूक लढवत आहे, असे तुषार कुवर यांनी साम टिव्हीशी बोलताना सांगितले.
बऱ्याच वेळा पक्षाचे उमेदवार येतात, आश्वासन देतात, पण कामे करीत नाहीत, त्यांनी केलेल्या कामाला दर्जा नसतो. अपक्ष म्हणून निवडणूक जिंकल्यानंतर माझ्यावर कुणाचाही दबाब नसेल, त्यामुळे चांगल्या पद्धतीचे कामे करता येईल, असे तुषार कुवर यांनी सांगितले.
शहादा पालिकेसाठी भाजपा आणि जनता विकास आघाडी यांच्यात प्रमुख लढत आहे. जनता विकास आघाडी आणि एमआयएम या दोन पक्षांनी निवडणुकीत एन्ट्री केल्याने निवडणुकीत चुरस वाढली आहे. नगरसेवकांच्या २९ जागांसाठी ११९ उमेदवार मैदानात उतरले आहे.
नगराध्यक्षपदासाठी भाजपाकडून मकरंद पाटील, जनता विकास आघाडीतर्फे अभिजित पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खाटीक मकसूद शेख गफ्फार, एआयएमआयएम पक्षाचे पिंजारी साजिद रहीम, तर दोन अपक्ष उमेदवार पिंजारी शेख आरिफ शेख मासुम आणि बेलदार मेहमूद शेख अहमद असे 6 उमेदवार रिंगणात आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.