नाशिक : एकीकडे मशीदीवरील भोंग्यांच्या (Loud speakers of Mosque) विरोधात भूमिका घेणाऱ्या `मनसे` (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thakre) यांच्या भूमिकेला मुस्लीम नगरसेवकांनी पाठींबा दिला. दुसरीकडे आज याच विषयावरून शहेबाज काझी यांनी पक्षाला खुदा हाफीज केला. त्यांनी मनसे सोडल्याने त्यांचा सत्कार करण्यात आल्याने राज ठाकरेंना नाशिकमधून दुसरा धक्का बसला.
राज ठाकरे यांची भोंग्याविषयी भूमिका न पटल्याने मनसैनिक शहेबाज काझी यांनी पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ केला. यामुळे शहरातील विविध मुस्लिम सामाजिक सस्थांकडून त्यांचा सत्कार झाला. नुकताच, युनिटी अमन फाउंडेशनचे प्रमुख साजिद मुलतानी यांकडून काझी यांचा सत्कार केल्याने राज ठाकरेंच्या भूमिकेला नाशिकच्या अल्पसंख्यांक समाजाकडून धक्का बसला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्याला हात घालत जोरदार भाषण केले होते. जर मशिदीवरून भोंगे काढले नाही तर त्या समोर मोठे भोंगे लावून हनुमान चालीसा म्हणा, असा इशारा त्यांनी दिला होता.
राज ठाकरे यांच्या याच भूमिकेकरून मनसेतच भिन्न मतप्रवाह आढळले. पुणे येथील वसंत मोरे यांनी याबाबत वेगळी भूमिका मांडल्याने त्यांची उचलबांगडी झाली. नाशिकला नगरसेवक सलीम शेख यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेला पाठींबा दिला होता. त्यांचे मनसेच्या नेत्यांनी स्वागत केले तर मुस्लीम समाजाच्या एका नेत्याने टीका केली होती.
माजी नगरसेवक सलिम शेख यांनी राज यांच्या भूमिकेला समर्थन केल्यामुळे मुस्लिम समाजाकडून विरोध झाला. दुसरीकडे शुक्रवारी विद्यार्थी सेनेचे शहर सरचिटणीस शहेबाज काझी यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांनी राज यांची ही भूमिका न पटल्याने राजीनामे दिले आहे. शहेबाज काझी यांनी शहराध्यक्षांकडे राजीनामा सुपूर्द करताना येत्या काही दिवसात मनसेचे आणखी काही मुस्लिम पदाधिकारी राजीनामे देणार असल्याचा दावा केला. त्यानंतर त्यांचा सत्कार करण्यात आल्याने राज यांना नाशिकमधून दुसरा धक्का बसला.
----
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.