
Shani Shingnapur Trust scam : नेवासा तालुक्यातील शनिशिंगणापूर इथल्या श्री शनैश्वर देवस्थान ट्रस्टच्या बनावट अॅप प्रकरणी पोलिसांना मोठा लिड मिळाला आहे. देवस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यावर तब्बल एक कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम आढळली आहे.
पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी देखील या माहितीला दुजोरा दिला. या कारवाईमुळे बनावट अॅपद्वारे देवस्थानची फसवणूक करणाऱ्या 'आका'पर्यंत पोलिस लवकरच पोचणार असल्याची चर्चांना जोर धरला आहे.
पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे म्हणाले, "शनि शिंगणापूर (Shani Shingnapur) इथल्या श्री शनैश्वर देवस्थान ट्रस्टच्या अॅप्लिकेशन तपासात, देवस्थानने काही अॅप्लिकेशनला परवानगी दिलेली आहे. काही अॅप्लिकेशनला परवानगी दिलेली नाही. दोन्ही प्रकारच्या अॅप्लिकेशनचा तपास सायबर सेल पोलिस करत आहे. या अॅपचा लाभार्थ्यांकडून माहिती घेतली. तसेच ऑनलाईन पैसे कसे पाठवले गेले, याची देखील माहिती घेतली".
'यात संस्थानच्या दोन कर्मचारी, ते जे संस्थेच्या कायम नियुक्ती असलेले कर्मचारी आहेत, त्यांच्या खात्यावर एक कोटींपेक्षा जास्त रक्कम आढळली आहे. ही रक्कम वेगवेगळ्या स्वरुपात आली आहे. कधी दोन लाख, तर कधी 20 लाख रुपये आलेले आहेत. या दोन कर्मचाऱ्यांचा तपास चालू आहे. यांच्याकडे हे पैसे कोणी दिले आहेत. यातील पैसे स्वतःसाठी किती ठेवले आणि पुढे कोणाला वर्ग केले आहेत', असे पोलिस अधीक्षक (Police) सोमनाथ घार्गे यांनी सांगितले.
'शनैश्वर देवस्थान ट्रस्टने ज्या कंपनींना अॅप्लिकेशन चालवण्यासाठी परवानगी त्यांच्याकडून किती महसूल मिळाला याची देखील पोलिस चौकशी करत आहेत. या कंपन्यांनी देवस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यावर एक कोटी रुपयांवर अधिक रक्कम दिल्याचे तपासात समोर आलं आहे', असे ही सोमनाथ घार्गे यांनी सांगितले.
अहिल्यानगर सायबर पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात महत्त्वपूर्ण लिड घेतला आहे. देवस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात एक कोटीहून अधिक रक्कम जमा झाल्याचे उघड झाल्याने त्यांच्याकडे चौकशी सुरू असली, तरी त्यांचे नावे सांगण्यास पोलिसांनी नकार दिला. आता या दोन कर्मचाऱ्यांच्या मागे नेमकं कोण आहे, याचा देखील तपास केला जात आहे.
सायबर पोलिसांच्या फिर्यादीनुसार पूजा परिसेवा डॉट कॉम, नवग्रह मंदिर डॉट कॉम, ऑनलाइन प्रसाद डॉट कॉम, हरी ओम अॅप आणि ई-पूजा डॉट कॉम या पाच बनावट अॅप चालक कंपन्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु, श्री शनैश्वर देवस्थान ट्रस्टचे या पाच बनावट अॅप व्यक्तिरीक्त आणखी काही बनावट अॅप कार्यरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. यात देखील कोट्यवधींचा गैरव्यवहार झाल्याचा संशय आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.