Shankarrao Gadakh : शिवसेनेचे शंकरराव गडाख संतापले; 'शेतकऱ्यांना त्रास दिल्यास, दुसऱ्या भाषेत सांगावा लागेल'

Shankarrao Gadakh displeasure with Mahavitaran administration : नेवासा तालुक्यात विजेचा लंपडाव सुरू असून यात सुधारणा करावी, असा इशारा आमदार शंकरराव गडाख यांनी दिला आहे. महावितरणने नेवासा तालुक्यातील रिक्त पदं त्वरीत भरावीत, अशी देखील मागणी केली.
Shankarrao Gadakh
Shankarrao Gadakhsarkarnama

Ahmednagar News : नेवासा तालुक्यातील विजेच्या खेळखंडोब्यावर शिवसेनेचे माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर संताप व्यक्त केला आहे. वीज उपलब्धतेवरून शेतकऱ्यांना त्रास झाल्यास अधिकाऱ्यांना दुसऱ्या भाषेत सांगावे लागेल, असे म्हटले आहे. आमदार गडाख यांच्या आक्रमक भूमिकेची महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी धास्ती घेतली आहे.

नगर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. यामुळे संपूर्ण नगर जिल्ह्यातच विजेचा लंपडाव सुरू झाला आहे. पूर्ण वेळ आणि संपूर्ण दाबानं वीज मिळत नसल्याच्या शेतकऱ्यांकडून तक्रारी आहेत. नेवासा तालुक्यातील वीज वितरणाचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. रविवारपासून विजेचा विस्कळीत पुरवठा होत आहे. त्यामुळे महावितरणचे नेवासा तालुक्यात नेमकं काय चालू आहे? असा प्रश्न पडला आहे. शेतकऱ्यांची खरीप हंगामाची लगबग सुरू असतानाच विजेचा लंपडाव सुरू असल्याने शेतकरी संतप्त झाला आहे. महावितरणच्या या कारभाराची दखल शिवसेना (Shiv Sena) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार शंकरराव गडाख यांनी घेतली आहे.

आमदार शंकरराव गडाख यांनी जिल्ह्यातील इतर तालुक्यात विजेची (Mahavitaran) अडचण होत नाही. पण नेवासा तालु्क्यात विजेची अडचण का? असा सवाल केला आहे. अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू आहे. यात सुधारणा करावी. शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात. त्या दूर कराव्यात. शेतकऱ्यांना त्रास दिल्यास अधिकाऱ्यांना दुसऱ्या भाषेत सांगावा लागेल. खरीपाच्या तोंडावर विजेचा लंपडाव न थांबल्यास आणि शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही, असे शंकरराव गडाख यांनी सुनावले आहे.

Shankarrao Gadakh
Nilesh Lanke : खासदार लंके यांचा विश्वास पाहा; 'नगर जिल्ह्यात पवारसाहेबांचे 12 आमदार असतील...'

नेवासा तालुक्यात महावितरणकडून अधिकाऱ्यांची 50 टक्के पद रिक्त आहेत. रोहित्रांची आणि उपकेंद्रातील दुरुस्तीची कामे वेळेवर होत नाही. यातून केंद्रात उपकरणं नादुरुस्तीचे प्रमाण वाढले आहे. विजेसाठी अधिकाऱ्यांना संपर्क केल्यावर फोन उचलत नाही. रोहित्रांच्या दुरुस्तीची मागणी केल्यावर ती वेळेवर दुरुस्ती होत नाही. शेतकरी आपपाल्या पद्धतीने पैसे गोळा करून रोहित्रांची दुरुस्ती, विजेच्या खांबांची उपलब्ध करत आहेत. महावितरणकडून कार्यवाही सुरू आहे, या आश्वासनाशिवाय काहीच मिळत नाही. या सर्व प्रकारात महावितरणे सुधारणा करावी. अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा आमदार शंकरराव गडाख यांनी दिला आहे.

Shankarrao Gadakh
Sadashiv Lokhande Vs Bhausaheb Kamble : लोखंडेंचा नादच खुळा; खुर्चीची 'हौस' फारच, आता आमदार व्हायचंय...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com