Sadashiv Lokhande Vs Bhausaheb Kamble : लोखंडेंचा नादच खुळा; खुर्चीची 'हौस' फारच, आता आमदार व्हायचंय...

Sadashiv Lokhande Shrirampur Vidhan Sabha Politics : सदाशिव लोखंडे यांची आता लोकसभाच्या पराभवानंतर विधानसभा निवडणूक लढण्याची इच्छा आहे. लोखंडे यांचा हा राजकीय उत्साहाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बळ मिळणार का? याची चर्चा आता रंगली आहे.
Sadashiv Lokhande Vs Bhausaheb Kamble
Sadashiv Lokhande Vs Bhausaheb Kamblesarkarnama

Shrirampur News : महायुती शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे शिर्डी लोकसभा मतदारसंघातून पराभूत झाल्यानंतर त्यांनी श्रीरामपूर विधानसभेसाठी चाचपणी करत आहेत. तसे त्यांच्या कार्यकर्त्यांकडूनच संकेत मिळालेत. त्यांचे पुत्र डाॅ. चेतन लोखंडे यांनी उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू असल्याचे संकेत दिलेत.

यावरून खुर्चीसाठी लोखंडे यांच्या कुटुंबियांनी बांधलेला चंग श्रीरामपुरात चर्चेत आला आहे. मात्र शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून इच्छुक असलेले माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी देखील उमेदवारीसाठी फिल्डिंग लावली आहे. त्यामुळे श्रीरामपूरच्या उमेदवारीसाठी शिंदे गटातील माजी खासदार-माजी आमदारांमध्ये संघर्ष पाहायला मिळू शकतो.

शिर्डी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी शिवसेना (Shiv Sena) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भाऊसाहेब वाकचौरे 50 हजार मंतांनी विजयी झाली. शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या पराभवात संगमनेर आणि अकोले विधानसभा मतदारसंघाचा महत्त्वपूर्ण वाटा राहिला आहे. नेवासा, श्रीरामपूर, कोपरगाव आणि शिर्डी विधानसभा मतदारसंघातून लोखंडे यांना चांगले मताधिक्य आहे.

श्रीरामपूरमध्ये लोखंडे यांना सुमारे 12 हजार मतांची आघाडी आहे. सदाशिव लोखंडे यांचा लोकसभा निवडणुकीत पराभवाची वेगळी कारणे असल्याचे सांगितली जात आहे. सदाशिव लोखंडे यांची आता लोकसभाच्या पराभवानंतर विधानसभा निवडणूक लढण्याची इच्छा आहे. लोखंडे यांचा हा राजकीय उत्साहाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बळ मिळणार का? याची चर्चा आता रंगली आहे.

Sadashiv Lokhande Vs Bhausaheb Kamble
Vaibhav Pichad Vs Kiran Lahamate : पिचडांना घरवापसीचे तर, लहामटे शरद पवारांच्या संपर्कात? कोणाला 'चान्स' मिळणार...

श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जाती-जमातीसाठी राखीव आहे. या मतदारसंघात काँग्रेसचा आमदार आहे. लहू कानडे येथून काँग्रेसचे प्रतिनिधित्व करत आहेत. सदाशिव लोखंडे यांनी या मतदारसंघावर विधानसभेच्या उमेदवारीसाठी दावा केला आहे. आपल्यासाठी किंवा मुलासाठी शिवसेनेकडून उमेदवारी मिळावी, अशी त्यांची इच्छा आहे.

तशी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे त्यांनी फिल्डिंग लावल्याचे सांगितले जात आहे. सदाशिव लोखंडे यांनी शिर्डीचे दहा वर्षे प्रतिनिधित्व केले आहे. श्रीरामपुरात त्यांच्याबरोबर शिवसेना आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाकडून घरात उमेदवारी मिळावी यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचे लोखंडे यांचे पुत्र डाॅ. चेतन लोखंडे यांनी सांगून उमेदवारीबाबत चुरस असल्याचे संकेत दिले.

Sadashiv Lokhande Vs Bhausaheb Kamble
Sadashiv Lokhande : विखे पुत्रासाठी दक्षिणेत गुंतले, थोरातांनी हेरलं; मुख्यमंत्री मैदानात तरी लोखंडेंविरोधात वारं फिरलं!

याच मतदारसंघातून माजी आमदार भाऊसाहेब कांबळे इच्छुक आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ऐनवेळी साथ सोडत माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी शिवसेना एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला होता. यामागे त्यांच्या पुढच्या राजकीय भवितव्याचा निर्णय होता.

परंतु सदाशिव लोखंडे यांचा पराभव आणि त्यांनी श्रीरामपुरात सुरू केलेली चाचपणी भाऊसाहेब कांबळेंची राजकीय महत्त्वकांक्षेवर पाणी फिरवू लागली आहे. महायुतीत श्रीरामपुरची जागा शिवसेनेकडे होती. शिवसेनेत दोन गट पडले आहेत. या जागेवर शिवसेनेचा दावा असणार आहे. भाजप मोठा पक्ष असला तरी, शिवसेनेची जबाबदारी भाजपकडे राहणार आहे. श्रीरामपुरात शिवसेना शिंदे गटाकडून लोखंडे की, कांबळे यांच्या रस्सीखेच असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com