Uddhav Thackrey Politics: शिवसेनेचा इशारा, महायुतीने तो निर्णय न घेतल्यास राज्यातील जिल्हा बँका संकटात जाणार...

Sharad Patil; Fraud regarding loan waiver by Mahayuti coming to power?-शिवसेना ठाकरे पक्षाने महायुतीला दिला कर्जमाफी बाबत सज्जड इशारा.
Sharad Patil & Devendra Fadanvis
Sharad Patil & Devendra FadanvisSarkarnama
Published on
Updated on

Mahayuti Vs Shivsena News: महायुतीच्या विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा शब्द देण्यात आला होता. मात्र सत्तेत येतात अन्य योजनेप्रमाणेच शेतकऱ्यांना गुंडाळण्याचा प्रयत्न महायुती करत आहे. सध्या राज्य सरकार कर्जमाफी विषयी चकार शब्दही बोलत नाही.

या संदर्भात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे धुळे जिल्हा अध्यक्ष आणि माजी आमदार शरद पाटील यांनी महायुतीला इशारा दिला आहे. निवडणूक प्रचारात महायुतीच्या तिन्ही पक्षांनी सातबारा उतारा कोरा करणार. कर्जमाफी करणार, असे स्पष्ट सांगितले होते.

Sharad Patil & Devendra Fadanvis
Gulabrao Patil Politics: "एकनाथ शिंदेंचे ५० आमदार म्हणजे बाजीप्रभू देशपांडे यांचे मावळे"

सध्या मात्र महायुतीचे तिन्ही पक्ष या विषयावर बोलायला तयार नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी कुचंबना होत आहे. शेतकऱ्यांना संकटात टाकण्याचे काम महायुतीचे घटक पक्ष सत्तेत येतात करीत आहेत. मात्र त्यांनी या प्रश्नावर तातडीने कार्यवाही न केल्यास शिवसेना ठाकरे पक्ष त्यांना सळो की पळो करून सोडेल.

Sharad Patil & Devendra Fadanvis
Shivsena Politics : खासदार लंकेंची देखील शिंदेंच्या खासदाराच्या घरी स्नेहभोजनाला हजेरी; ठाकरेंचा शिलेदार म्हणतोय, वावगे काय?

माजी आमदार प्रा. शरद पाटील यांनी या विषयावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या गंभीर विषयावर राज्यभर आंदोलन करण्याचा शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचा प्रयत्न आहे. त्यासाठी राज्य सरकारला त्यांनी इशारा दिला आहे.

सध्या राज्य सरकार शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत पीक कर्ज देते. त्यावर सहा टक्के व्याज आकारले जाते. केंद्र शासनाच्या नव्या सहकार धोरणानुसार त्याची नोंद घेतली जाते. त्यामुळे सरकारच्या रेकॉर्डला शेतकऱ्यांना प्रतिवर्षी अठरा हजार रुपयांचा लाभ दिल्याची नोंद होईल. मात्र शेतकरी कोणताही लाभ न घेताच अडचणीत येतील. अशी स्थिती आहे. हे सर्व महायुती सरकारच्या धोरणामुळे होईल.

मावळत्या वर्षात जिल्हा बँकांनी ३०.७८ लाख शेतकऱ्यांना ३५४ कोटींचे कर्ज वितरण केले आहे. या कर्जाची वसुली करण्याची जबाबदारी जिल्हा बँकांवर आहे. १०० टक्के कर्ज वसुली न झाल्यास या बँका आर्थिक अडचणीत येतील. सध्या राज्यातील ३३ पैकी २८ बँका एनपीए मध्ये आहेत.

महायुतीच्या भाजप, शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष यांनी विधानसभा निवडणुकीत कर्जमाफीचे तोंड भरून आश्वासन दिले आहे. ते तातडीने पाळावे, अन्यथा राज्यातील जिल्हा बँका प्रचंड अडचणीत येतील. शेतकऱ्यांसाठी एक मोठे संकट निर्माण होईल, असा इशारा शिवसेना ठाकरे पक्षाचे माजी आमदार शरद पाटील यांनी दिले आहे.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com