Gulabrao Patil Politics: "एकनाथ शिंदेंचे ५० आमदार म्हणजे बाजीप्रभू देशपांडे यांचे मावळे"

Gulabrao Patil; we fifty soldiers are like Baji Prabhu Deshpande's 'Mavale' of Eknath Shinde-पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील म्हणतात, आम्ही बाजीप्रभू देशपांडे यांच्यासारखे एकनाथ शिंदे यांच्यासाठी भगवा फडकेपर्यंत लढत राहिलो
Gulabrao Patil
Gulabrao PatilSarkarnama
Published on
Updated on

Gulabrao Patil News: शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री शिंदे आभार सभा नाशिकला झाली. यावेळी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिंदे यांच्या कामाचे कौतुक केले. त्यांच्यामुळेच राज्यात महायुतीचे सरकार आल्याचा दावा केला.

मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले आम्ही शिवसेनेचे ५० आमदार सुरत मार्गे गुवाहाटीला गेलो. तेव्हा सर्व आम्हाला गद्दार म्हणत होते. सगळीकडे तीच चर्चा होती. मात्र आम्ही आमची आमदारकी आणि मंत्रीपद पणाला लावले होते. आम्ही सत्तेसाठी नव्हे तर सत्तेतून बाहेर पडण्यासाठी लढलो.

Gulabrao Patil
Eknath Shinde politics: एकनाथ शिंदे यांनी नाशिकच्या सभेत शरद पवारांचे ‘ते’ रेकॉर्ड आपल्या नावावर खपवले!

ज्याप्रमाणे बाजीप्रभू देशपांडे यांच्याकडे ५० मावळे होते. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना तुम्ही किल्ल्यावर जा, तोपर्यंत आम्ही लढू असा शब्द त्यांनी दिला होता. त्याचप्रमाणे आम्ही ५० आमदार एकनाथ शिंदे यांच्यासाठी लढलो. तुम्ही विधानसभेवर भगवा फडकवा, तोपर्यंत आम्ही सर्व ठामपणे तुमच्या सोबतच राहू, असे आम्ही सांगितले होते.

Gulabrao Patil
Shivsena Politics : खासदार लंकेंची देखील शिंदेंच्या खासदाराच्या घरी स्नेहभोजनाला हजेरी; ठाकरेंचा शिलेदार म्हणतोय, वावगे काय?

शिवसेना उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडण्यासाठी बंडखोरी केलेल्या शिवसेना पक्षाच्या त्या आमदारांना मंत्री पाटील यांनी चक्क मावळ्यांची उपमा दिली. बाजीप्रभू देशपांडे यांच्यासमोर मुघलांचे सैन्य लढत होते. त्यांच्याशी बाजीप्रभू देशपांडे यांनी यशस्वी लढा दिला. आम्ही देखील जोपर्यंत विधानसभेवर भगवा फडकत नाही तोपर्यंत शिंदे यांच्या मागे न डगमगता उभे होतो, असे ते म्हणाले.

आपल्या टीकाकारांचा त्यांनी `चोट्टे`, `भामटे` या शब्दात समाचार घेतला. शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्याचा गौरव म्हणून पुरस्कार देऊन सत्कार केला. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. पण शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातील लोकांना ही संस्कृती कशी समजणार? असा प्रश्न त्यांनी केला.

लोकसभा निवडणुकीत असे वातावरण निर्माण करण्यात आले होते की, आमचे अस्तित्व राहते की नाही अशी स्थिती होती. त्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रचंड काम केले. आपल्या कामातून वातावरण बदलले आणि त्यामुळे विधानसभेत अपार यश मिळाले.

मुख्यमंत्री शिंदे यांच्या लाडकी बहीण योजनेमुळेच राज्यातील वातावरण बदलले. पती राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मात्र पत्नीने शिवसेनेला मतदान केले. कारण महिलांना माहिती आहे की त्यांच्याकडून काहीच मिळालेले नाही. या भावाने मात्र थेट पंधराशे रुपये खात्यात जमा केले आहे. हा अंडरकरंट विरोधकांच्या लक्षातच आला नाही. त्यामुळेच महायुतीच्या आमदारांचे बंपर पीक आले असा दावा त्यांनी केला.

नाशिक येथे झालेल्या सभेत गुलाबराव पाटील यांच्या आक्रमक शैलीतील भाषणाने पक्षाच्या कार्यकर्त्यांना चांगलीच ऊर्जा मिळाली. सभेला मोठी गर्दी होती. पक्षाचे विविध पदाधिकारी आणि नेते सभेला उपस्थित होते.

-------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com