Sharad Pawar Vs Ajit Pawar : शरद पवार अजित पवार यांना मोठा धक्का देणार? नाशिकमध्ये मोठी घडामोड

Nashik NCP Politics : उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे माजी खासदार लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या गोटात
Sharad Pawar, Ajit Pawar
Sharad Pawar, Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Nashik Political News : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात मोठी अस्वस्थता जाणवू लागली आहे. येत्या काही दिवसात अजित पवार गटाचे एक मोठे नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत दाखल होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आज शहरात झालेल्या बैठकीत माजी खासदार देविदास पिंगळे यांच्या कुटुंबातील आकाश पिंगळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. पक्षाचे तालुका अध्यक्ष गणेश गायधनी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा प्रवेश झाला. हा प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासाठी धक्का मानला जात आहे.

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लवकरच तालुक्याचा दौरा करण्यात येणार आहे. त्यानंतर नवी कार्यकारणी घोषित करण्यात येईल, असे यावेळी जाहीर करण्यात आले. त्यामुळे नाशिक तालुका आणि शहरातील पक्ष संघटनेत फेरबदलाची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे नाशिक मतदारसंघातून विजयी झाले. या निवडणुकीत अजित पवार गटाच्या अनेक नेत्यांना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी फोन केले होते. त्यामुळे अनेक पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी महाविकास आघाडीला अनुकूल भूमिका घेतल्याचे बोलले जाते. या नेत्यांच्या बूथवर महाविकास आघाडीचा उमेदवार पुढे होता.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार Ajit Pawar गटाच्या एका माजी खासदाराचे लवकरच पक्षांतर होईल, असे संकेत शरद पवार गटाच्या नेत्यांनी दिले आहेत. या नेत्याची नाशिक बाजार समितीत सत्ता आहे. या सत्तेमुळे महायुतीतील ग्रामविकास मंत्री आणि भाजप नेते गिरीश महाजन यांच्याकडून सातत्याने अडचणीत आणण्याचे प्रयत्न केले जातात.

Sharad Pawar, Ajit Pawar
Nitesh Rane VS Aaditya Thackeray : ...तर आदित्य ठाकरे जेलमध्ये असते; नितेश राणेंचं वर्मावर बोट

या दबावामुळे संबंधित नेते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात आहेत. मात्र शरीराने अजित पवार गटात असलेल्या हा नेता मनापासून मात्र शरद पवार यांच्या गटातच आहे, असा दावा राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार Sharad Pawar गटाचे प्रदेश उपाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांनी केला. या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात त्यांनी पवार यांची भेट घेतली होती. आज देखील हे माजी खासदार बारामती येथे शरद पवार यांच्या भेटीला गेले आहेत, असे सांगण्यात आले.

या राजकीय घडामोडी पाहता, येत्या आठवड्याभरात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला नाशिकमध्ये मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट जोरदार तयारी करीत आहे. त्याचा आगामी विधानसभा निवडणुकीवर देखील परिणाम होऊ शकतो.

(Edited by Sunil Dhumal)

Sharad Pawar, Ajit Pawar
Abhijit Gangopadhyay : हायकोर्टाचे न्यायाधीश करणार 'या' पक्षात एन्ट्री ? हे आहे कारण...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com