Sharad Pawar On Ajit Pawar : शरद पवारांनी अजित पवारांना ठणकावलं ; म्हणाले, '' वयाचा उल्लेख कराल तर...''

Maharashtra Poolitics : '' आहे नाही तेवढी ताकद लावा आणि....''
Sharad Pawar -  Ajit Pawar
Sharad Pawar - Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Yeola : '' काही लोकं म्हणतात, तुमचं वय झालंय. वय झालं हे खरं आहे. पण, निवृत्त व्हा असं म्हणू नका. वयाच्या भानगडीत पडू नका. गडी काय हे पाहिलचं कुठं? काय टीका करायची ‌ती करा. पण वय आणि व्यक्तिगत टीका करू नका. वयाचा उल्लेख केल्यास महागात पडेल'' असा कडक इशारा शरद पवार यांनी एकप्रकारे अजित पवार आणि त्यांच्या गटाला दिला आहे.

अजित पवारां(Ajit Pawar)च्या बंडखोरीनंतर शरद पवार यांनी आपली पहिली सभा शनिवारी(दि.८) छगन भुजबळांच्या बालेकिल्ल्यात घेतली. यावेळी त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपली ताकद दाखवली आहे. त्यांनी अजित पवार गटाला नाव न घेता ठणकावलं आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार(Sharad Pawar) यांनी येवला या छगन भुजबळांच्या बालेकिल्ल्यातूनच त्यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. पवार म्हणाले, मी व्यक्तिगत बोलणार नाही. येवल्याचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी आलो आहोत. काही लोक म्हणतात माझे वय झाले. वय झाले हे खरं आहे. वय ८२ झाले. पण गडी काय आहे तु पाहिलं कुठं? अशा शब्दांत शरद पवारांनी अजितदादा आणि त्यांच्या गटाला ठणकावलं.

Sharad Pawar -  Ajit Pawar
Sanjay Shirsat On Notice News : विधानसभा अध्यक्षांची नोटीस ही एक प्रक्रिया, आमच्यावर कारवाई अशक्यच..

'' आहे नाही तेवढी ताकद लावा आणि....''

काही चुकीच्या घटना घडल्या असतील त्या दुरुस्त केल्या पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदीं(Narendra Modi)नी एका भाषणात काँग्रेससह व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरच भ्रष्टाचाराचे आरोप केले. पण माझे पंतप्रधानांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून सांगतो, तुम्ही आमच्यावर जे काही भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. ते आरोप भ्रष्टाचाराचे होते. तुमच्या हातात देशाची सत्ता आहे. या सत्तेचा वापर करून चौकशी करा. दोषींना शिक्षा करा. यावेळी आमचा तुम्हांला पाठिंबा राहील असंही पवार म्हणाले.

माझा अंदाज इथं चुकला...

मी इथं का आलो आहे. तर कुणावर टीका करण्यासाठी नाही किंवा कुणाचं कौतुक करण्यासाठी नाही तर माफी मागण्यासाठी आलो आहे. माझा अंदाज फारसा चुकत नाही. पण माझा अंदाज इथं चुकला. म्हणून माफी मागण्यासाठी मी इथं आलो आहे. माझा विचारांवर तुम्ही निकाल घेतले. आणि तुम्हांला माझ्यामुळे यातना झाल्या असतील तर माझं तुमची माफी मागणं हे माझं कर्तव्य आहे अशा शब्दांत पवार यांनी भुजबळांवर निशाणा साधला.

Sharad Pawar -  Ajit Pawar
Sharad Pawar On Bhujbal : शरद पवारांचा भुजबळांवर त्यांच्याच बालेकिल्ल्यातून तिखट वार, म्हणाले, '' माझा अंदाज चुकत नाही, पण...''

'' ...म्हणून आम्ही या येवल्याची निवड केली!"

महाराष्ट्रात या जिल्ह्यानं अनेक वर्षे पुरोगामी विचारांना साथ दिली. या नाशिकमधील शेतकरी, कष्टकरी, आदिवासी, दुष्काळी भागातील शेतकरी असेल यांच्यावर अनेक संकट आली पण त्यांनी कधी साथ सोडली नाही. त्यामुळं आम्ही विचार केला की मुंबईमध्ये काही लोकांना जनतेच्या समोर सादर केल्यानंतर यश मिळवायचं असेल, त्यांना महाराष्ट्राच्या विधानसभेत आणायचं असेल तर भक्कम विश्वासाच्या मतदारसंघाची आवश्यकता आहे. म्हणून आम्ही या येवल्याची निवड केली असंही शरद पवार यावेळी म्हणाले.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com