Jalgaon Sharad Pawar : लोकसभेत 80 टक्क्यांचा स्ट्राईक रेट तरीही शरद पवार गटात अस्वस्थता; नेमकं काय झालं?

Jalgaon NCP SP Politics : रावेर लोकसभा मतदारसंघातून शरद पवार गटाचे श्रीराम पाटील यांना 3 लाख 58 हजार 696 मते मिळाली असून त्यांचा तब्बल 2 लाख 72 हजार 183 मतांनी पराभव झाला आहे.
Ravindra Patil
Ravindra PatilSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon Political News : लोकसभा निवडणुकीत सर्वात चांगेल यश कोणत्या पक्षाला मिळाले असेल तर तो म्हणजे राष्ट्रावादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्ष. ज्येष्ठ नेते शरद पवारांनी आघाडी टिकवण्यासाठी जागांसाठी जास्त खळखळ घालण्याऐवजी मिळालेल्या सीटमधील जास्तीत जास्त कशा निवडून येतील, याकडे लक्ष दिल्याचे बोलले जाते.

शरद पवार Sharad Pawar गटाने लोकसभा निवडणुकीत 10 पैकी तब्बल आठ जागा जिंकून फुटीनंतरही आपणच टॉपवर असल्याचे दाखवून दिले. असे असतानाही शरद पवार गटाची जळगाव जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.

लोकसभेत शरद पवार गटाने बारामती, शिरूर, अहमदनगर, माढा, सातारा, वर्धा, रावेर, बीड, भिवंडी आणि दिंडोरी या दहा जागा लढवल्या. यातील फक्त सातारा आणि रावेर या दोन जागांवर शरद पवार गटाचा पराभव झाला आहे. ही बाब जळगाव जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांच्या जिव्हारी लागल्याचे दिसून येते. जळगावमधील पराभवाची जबाबदारी स्वीकारत रवींद्र पाटलांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

रावेर लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या रक्षा खडसे Raksha Khadse 6 लाख 30 हजार 879 मते घेत विजयी झाल्या आहेत. तर दुसऱ्या स्थानावर राहिलेले शरद पवार गटाचे श्रीराम पाटील यांना 3 लाख 58 हजार 696 मते मिळाली. त्यांचा तब्बल 2 लाख 72 हजार 183 मतांनी पराभव झाला आहे. लोकसभेत झालेल्या या पराभवाचे जबाबदारी स्वीकारत शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांनी राजीनामा दिला. तसेच संपूर्ण जिल्हा कार्यकारिणीही बरखास्त करण्यात आली.

Ravindra Patil
Ajit Pawar Vs Suresh Dhas : अजित पवार गटामुळं आमचं वाटोळं झालं; सुरेश धसांची खदखद बाहेर

यावर जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील म्हणाले, रावेर लोकसभेत मोठ्या मताधिक्याने राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवाराचा पराभव झाला आहे. या पराभवाची माझी नैतिक जबाबदारी ही माझी आहे. त्यामुळे मी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

लोकसभेतील पराभवाच्या पार्श्वभूमीवर जळगावात राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतन आणि मंथन बैठक पार पडली. यात सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय घेतला. तसेच नवीन जिल्हा कार्यकारिणी नियुक्त करण्याची सूचनाही पदाधिकारी कार्यकर्त्यांनी बैठकीत वरिष्ठांसमोर मांडली.

बैठकीत निरीक्षक प्रसन्नजीत पाटील यांचे सर्व फ्रंटल सेलचे अध्यक्ष पदाधिकाऱ्यांना राजीनामे देण्याचे आदेश दिले आहेत. यानंतर आता विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटाची नवीन जिल्हा कार्यकारणी जाहीर होणार असल्याची चर्चा आहे. यात शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष म्हणून कुणाची वर्णी लागणार, याकडे जळगाव जिल्ह्याचे लक्ष आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Ravindra Patil
Video Vidhanparishad Election News : भाजपकडून विधानपरिषदेसाठी कोणाला लागणार लॉटरी ? शिंदे गट, काँग्रेसकडून 'या' नावांची चर्चा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com