Nilesh Lanke : संयम ठेवा, उद्या सत्तेत..! नीलेश लंकेच्या विधानानं पुन्हा खळबळ

NCP Sharad Pawar faction MP Nilesh Lanke hints at a political comeback, says “we will be in power soon” during a speech in Parner : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार नीलेश लंके यांनी आमदारकी लढवण्याबरोबरच सत्तेत असणार असल्याचे विधान करत खळबळ उडवून दिली.
Nilesh Lanke
Nilesh Lanke Sarkarnama
Published on
Updated on

Sharad Pawar NCP news : पारनेरमधून आमदरकी लढवण्याच्या पाठोपाठ, 'लढा आणि संयम ठेवा, आज विरोधात असलो, तरी उद्या सत्तेत येऊ', असे विधान करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अहिल्यानगरचे खासदार नीलेश लंके यांनी खळबळ उडवून दिली.

खासदार लंके हे त्यांचा बालेकिल्ला असलेल्या पारनेर विधानसभा मतदारसंघात गेल्या काही दिवसांपासून प्रचंड सक्रिय झाले आहेत. यातून ते करत असलेल्या विधानांमुळे अहिल्यानगरचं राजकारण ढवळून निघत आहे.

खासदार नीलेश लंके (Nilesh Lanke) यांनी अहिल्यानगरमधील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना, विरोधकांना गुगलीवर कसं घेरलं, यावर भाष्य करत जोरदार फटकेबाजी केली. “मी एक गुगली टाकली आणि लगेच रिप्लाय आला. राजकारणात अशीच खेळी समजून घेतली पाहिजे. त्यामुळेच मी आमदार अन् खासदार होऊ शकलो,” असे ते म्हणाले.

खासदार लंके यांनी, आपली भूमिका स्पष्ट करताना, “लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवून निवडून दिले. श्रीगोंदा, कर्जत-जामखेड, राहुरी, पाथर्डी, अहिल्यानगर शहर, नगर तालुका, पारनेर या मतदारसंघांना (Lok Sabha) न्याय देण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. मी त्यासाठी पूर्णतः सक्षम आहे, असे म्हटलं.

Nilesh Lanke
Nilesh Lanke Parner Election : खासदार लंकेंना दिल्लीत करमेना! कुणाची तरी जिरवायची होती, म्हणून लोकसभा लढली; आता '2029'ला मुंबईची तयारी!

ते म्हणाले, “राजकारणात कधी कधी जाणीवपूर्वक विधान करून प्रतिक्रिया पाहावी लागते. कोण आक्रमक होतो, कोण शांत राहतो, यावरून पुढील रणनीती ठरवता येते. प्रत्येक टीकेला उत्तर देत बसलो, तर कामासाठी वेळ मिळणार नाही. त्यामुळे संयम राखणे अत्यंत गरजेचे आहे.”

Nilesh Lanke
Vivek Kolhe MLC candidature : बावनकुळेंचा कोल्हेंसाठी विधान परिषदेचा पुनरूच्चार; अमितभाई अन् कार्यकर्त्यांच्या मनातलं ओळखलेलं अजितदादांचं 'ते' विधान!

खासदार लंके यांनी “आज सत्ता नसली, तरी खचून जाण्याचे कारण नाही. राजकारण प्रवाही आहे. आज विरोधात असलेले उद्या सत्तेत येऊ शकतात. लढा आणि संयम ठेवा. शरद पवार यांच्या दीर्घ राजकीय कारकिर्दीचा उल्लेख करताना, “पवार साहेब, अनेक वर्षे विरोधात राहूनही कधी डगमगले नाहीत,” असे सांगितले.

विरोधकांवर टीका करताना खासदार लंके म्हणाले, “काहींना वाटते मी मावळलो आहे. मात्र ज्यांच्या जोरावर तुम्ही उड्या मारता, त्यांनाच घरी बसवण्याची ताकद माझ्यात आहे. डबक्यातल्या बेडकाला वाटते तेच जग आहे. पण बाहेरचे जग खूप मोठे आहे.”

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com