Vivek Kolhe MLC candidature : बावनकुळेंचा कोल्हेंसाठी विधान परिषदेचा पुनरूच्चार; अमितभाई अन् कार्यकर्त्यांच्या मनातलं ओळखलेलं अजितदादांचं 'ते' विधान!

Chandrashekhar Bawankule reiterates support for Vivek Kolhe Legislative Council bid during Shirdi visit; Ajit Pawar past remarks spark fresh political debate in Kopargaon : विधान परिषदेसाठी विवेक कोल्हे यांना दिलेल्या शब्दाचा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुनरूच्चार करताच, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विधान चर्चेत आले आहे.
Vivek Kolhe MLC candidature
Vivek Kolhe MLC candidatureSarkarnama
Published on
Updated on

Legislative Council Election : भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत 5 ऑक्टोबर 2025रोजी सहकार क्षेत्रातील देशातील पहिल्या सीएनजी प्रकल्प अन् शेतकरी मेळावा घेत, जोरदार शक्तिप्रदर्शन केलं होतं.

या मेळाव्यात अजितदादा यांनी विवेक कोल्हे यांना उद्देशून म्हटलं होते की, 'कार्यकर्त्यांच्या जे मनात आहे, तेच अमितभाईंच्या मनात आहे'. दिवंगत अजितदादांचे हे विधान अन् मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल शिर्डी दौऱ्यात विधान परिषदेचा केलेल्या पुनरूच्चारामुळे कोपरगावसह अहिल्यानगर जिल्ह्यातील कोल्हे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.

महाराष्ट्र विधान परिषदेच्या (Vidhan Parishad) 9 जागांसाठी नियमित निवडणूक तर, एका जागेची पोटनिवडणूक पार पडत आहे. 12 मे रोजी सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत मतदानानंतर सायंकाळी निकाल जाहीर होत आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटची तारीख 30 एप्रिल आहे.

महायुतीतील भाजपच्या (BJP) वाट्याला सहा, एकनाथ शिंदे शिवसेनेला दोन, तर अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीला प्रत्येकी एक येत आहे. महायुतीमधील संभाव्य उमेदवारांची चर्चा सुरू आहे. यात अहिल्यानगर जिल्ह्यातून भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांचे नाव चर्चेत आले आहे.

Vivek Kolhe MLC candidature
Vivek Kolhe MLC : 'पक्षाचा शब्द अंतिम!' विवेक कोल्हेंचा मार्ग मोकळा? बावनकुळेंनी पत्ते उघडले!

मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा काल शिर्डी दौरा झाला. या दौऱ्यात त्यांनी, युवा नेते विवेक कोल्हे यांना विधानसभा निवडणुकीवेळी विधान परिषदेवर संधी देण्याचा शब्द दिल्याचा पुनरूच्चार केला. साईबाबा तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करोत, अशा सदिच्छा देताच, कोल्हे समर्थकांमध्ये विधान परिषदेच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

Vivek Kolhe MLC candidature
Govind Mokate Bypoll History : गोविंद मोकाटेंचा पोटनिवडणुकीतील विजयाचा 'ट्रॅक रेकॉर्ड भारी'; 'राहुरी'च्या निकालाची वाढली धडधड!

दीड वर्षांपासून कोल्हे समर्थक विवेक कोल्हे यांच्या राजकीय पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यानच्या काळात त्यांच्या पुढाकारातून सहकार क्षेत्रातील देशातील पहिल्या सीएनजी प्रकल्प सुरू झाला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार हे या कार्यक्रमासाठी कोपरगावात आले होते.

अजितदादांचे 'ते' विधान चर्चेत

यानिमित्ताने शेतकरी मेळावा घेत, विवेक कोल्हे यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. या शक्तिप्रदर्शनाचं कौतुक करताना दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, कार्यकर्त्यांच्या जे मनात आहे, तेच अमितभाईंच्या मनात आहे, असे विधान केलं होतं. मंत्री बावनकुळे यांच्या विधान परिषदेच्या पुनरूच्चाराने हे विधान पुन्हा चर्चेत आलं आहे.

काळे-कोल्हे राजकीय संघर्ष

विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार आमदार आशुतोष काळे यांना त्यांचे प्रतिस्पर्धी युवानेते विवेक कोल्हे यांच्या गटाने पाठिंबा दिला होता. परिणामी आशुतोष काळे सव्वा लाख मतांची आघाडी घेऊन विजयी झाले. तत्पूर्वी 2019च्या विधानसभा निवडणुकीत स्नेहलता कोल्हे अन् आशुतोष काळे यांच्यात लढत होत, काळे केवळ 400 मतांनी विजयी झाले होते.

लढवय्ये विवेक कोल्हे

विवेक कोल्हेंनी नाशिक शिक्षक मतदारसंघाची अपक्ष निवडणूक लढत, दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती. एकनाथ शिंदे शिवसेनेचे आमदार किशोर दराडे यांना या निवडणुकीत झुंजवलं होतं. यातून विवेक कोल्हे यांचे राजकीय महत्व आणि शक्तीची दखल भाजपने विधान परिषद निवडणुकीत घ्यावी, अशी चर्चा कोल्हे समर्थकांमध्ये रंगली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com